आवळा या फळाला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे. साधारण हिवाळ्यामध्ये उपलब्ध होणारे हे फळ रसदार आणि शक्तिवर्धक आहे. आवळ्यापासून लोणचे, मुरंबा, ज्यूस, सुपारी, चूर्ण असे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून त्याचे मूल्यवर्धन करता येते.
आवळ्याचे औषधी गुणधर्म
१. सी जीवनसत्वाचा उत्तम स्राेत
सर्व फळांपैकी सर्वात जास्त आवळ्यामध्ये सी जीवनसत्वाचे प्रमाण आढळते. साधारणपणे संत्रा फळाच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त जीवनसत्व सी चे प्रमाण आढळते.
२. त्रिदोषनाशक
आवळा तुरट-आंबट असल्याने पित, कफ व जुलाब या आजारांवर औषध म्हणून काम करते त्यामुळे त्याला त्रिदोषनाशक म्हटले जाते.
३. आवळ्याचे अन्य गुणधर्म
आवळा हा वीर्यवर्धक, पाचक, ज्वरनाशक अणि स्नायू, दात मजबुतीसाठी उपयुक्त असून केसांच्या चांगल्या अरोग्यासाठीही गुणकारी आहे.
आवळा खाण्याची इच्छा अनेकांना असते पण त्याचा आंबटपणा आणि तुरटपणा अनेकांच्या दातांना सोसत नाही. अशावेळी आवळा खाताना त्याला मीठ, हिंग आणि तिखट लावून खावे, त्याचा आंबटपणा व तुरटपणा बराच कमी होतो.
आवळ्याचे विविध पौष्टीक पदार्थ
१. आवळ्याचे लोणचे
- अर्धा किलो आवळे मंद आचेवर वाफवून घ्यावेत आणि बिया वेगळ्या कराव्यात.
- कढईत तेल घालून त्यात लाल मिरच्या लालसर रंग होईपर्यंत तळाव्यात.
- तेलामध्ये १ मोठा चमचा मोहरी व प्रत्येकी १ चमचा जीरे, बडीशेप, १/४ चमचा ओवा, १ चिमूट हिंग, अर्धा चमचा हळद व गरम मसाला तळून घ्यावा.
- तेलातील मिश्रणात आवळे सोडावे व चवीनुसार मीठ घालून मिसळावे.
- सर्व मिश्रण गार होऊ द्यावे. थंड झाल्यावर त्यात लाल तिखट घालून ढवळावे आणि बरणीत भरावे.
२. आवळा कँडी
- आवळे बारीक चिरावेत व त्यातील बिया काढून टाकाव्यात.
- साखरेचा पाक करून तो गार झाल्यावर त्यात आवळ्याचे तुकडे घालावेत.
- एक दिवस हे मिश्रण तसेच झाकून ठेवावे.
- दुसऱ्या दिवशी ज्यास्तीचा पाक गाळावा आणि त्यात साखर घालावी.
- हे मिश्रण पुन्हा एकदा उकळावे. त्यात आवळ्याचे तुकडे घालून मिश्रण पुन्हा एक दिवस ठेवावे.
- याच पद्धतीने मिश्रण पाच दिवस ठेवावे.
- पाच दिवसांनंतर आवळ्याचे तुकडे बाहेर काढून उन्हात पूर्ण सुकवावे.
३. आवळा सुपारी
- आवळे स्वच्छ धुऊन घ्यावेत, उकडून घ्यावेत आणि बिया काढून टाकाव्यात.
- आवळ्याचे तुकडे बरणीत भरून २ चमचे सैधवमीठ, १ चमचा साधे मीठ आणि अर्धा चमचा काळी मीरपूड, प्रत्येकी अर्धा चमचा जिरे व ओवा पुड घालावी.
- सर्व मिश्रण एकत्र मिसळावे. हे मिश्रण ३ दिवस मुरू द्यावे व दिवसातून दोन वेळा हलवावे.
- नंतर मिश्रण ताटामधे पसरवून उन्हात वाळवावे. ३ ते ४ दिवस वाळवल्यानंतर तयार सुपारी हवाबंद डब्यात भरावी.
४. आवळ्याचे सरबत
- ५-६ आवळे वाफवून घ्यावेत. बिया काढून गर काढावा.
- गरामध्ये २ चमचे साखर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा मीरपूड, अर्धा चमचा आल्याचा रस घालून एकत्र पल्प बनवावा आणि गाळणीने गाळून घ्यावे.
- तयार रसामध्ये पाव चमचा लिंबाचा रस आणि पाणी मिसळून सरबत तयार होते.
संपर्क ः शारदा पाटेकर, ९१५६०२७७३८
(शिवरामजी पवार अन्नतंत्र महाविद्यालय, नेहरूनगर, कंधार, नांदेड)

0 comments:
Post a Comment