मांसपेशी, मज्जा संस्थेवर नियंत्रण, गर्भवाढी आणि दूध उत्पादनासाठी कॅल्शिअम महत्त्वाचे कार्य बजावते. परंतु याच्या कमतरतेमुळे जनावरांमध्ये प्रजननासंबंधी समस्या उद्भवतात, दूध उत्पादन कमी होते, दुग्धज्वर आजार होतो, वाढ खुंटते, जखमा लवकर भारत नाहीत, जनावरे अशक्त दिसू लागतात. हे लक्षात घेऊन जनावरांच्या दैनंदिन आहारात शिफारशीनुसार कॅल्शिअमचा समावेश करावा.
जनावरांच्या शरीर बांधणीसाठी अत्यंत आवश्यक असलेला क्षारमिश्रण घटक म्हणजे कॅल्शिअम. जनावरांच्या शरीरात १.३३ टक्के कॅल्शिअमचे प्रमाण असते. शरीरातील ९९ टक्के कॅल्शिअम हे हाडे आणि दातांमध्ये आणि तर राहिलेले १ टक्के कॅल्शिअम हे रक्त आणि इतर पेशींमध्ये साठलेले असते.
आरोग्य व्यवस्थापनात अत्यंत महत्त्वाचा घटक असलेले कॅल्शिअम जनावरांच्या शरीरात आम्ल-अल्कली यांचे संतुलन त्याचप्रमाणे पाण्याचे संतुलन राखण्याचे काम करते. हिरवा चारा (द्विदल चारापिके), फिश ऑइल, कॉडलिव्हर ऑइल, तेलविरहित पेंडी इ. हे कॅल्शिअमचे उत्तम स्रोत आहेत. मांसपेशी आणि मज्जा संस्थेवर नियंत्रण, गर्भवाढीसाठी आणि दूध उत्पादनासाठी कॅल्शिअम मोलाचे कार्य बजावते. परंतु याच्या कमतरतेमुळे जनावरांमध्ये प्रजननासंबंधी समस्या उद्भवतात, दूध उत्पादन कमी होते, दुग्धज्वर आजार होतो, वाढ खुंटते, जखमा लवकर भारत नाहीत, जनावरे अशक्त दिसू लागतात. त्यामुळे जनावरांच्या दैनंदिन आहारात कॅल्शिअमचा समावेश असणे गरजेचे असते. अन्यथा, कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे अनेक गंभीर समस्यांना सामोर जावे लागते. हे टाळण्यासाठी जनावरांचा आहार कॅल्शिअमसारख्या क्षारमिश्रणाने परिपूर्ण असावा.
जनावरांच्या रक्तातील प्रमाण
कॅल्शिअम ः ८ ते १२ मि.ग्रॅ./१०० मि.लि.
फॉस्फरस ः ४ ते ६ मि.ग्रॅ./१०० मि.लि.
मॅग्नेशिअम ः १ ते ३ मि.ग्रॅ./१०० मि.लि.
कॅल्शिअमचे कार्ये
- हाडांची व दातांची योग्य वाढ.
- रक्त गोठणे
- शरीरात आम्ल-अल्कली यांचे संतुलन, पाण्याचे संतुलन राखणे
- मांसपेशी आणि मज्ज संस्थेवर नियंत्रण राखणे
- चयापचयाच्या क्रिया घडून येण्यासाठी कॅल्शिअम महत्त्वाचे.
- गाभणकाळात गर्भाच्या वाढीसाठी उपयुक्त
- दूध उत्पादनातील महत्त्वाचा घटक
- शरीरात विविध विकरांची निर्मिती.
कॅल्शिअम कमतरतेची लक्षणे
- शारीरिक वाढ खुंटते. दूध उत्पादन घटते.
- रक्त गोठण्यास वेळ लागतो.
- हाडे ठिसूळ होतात. स्नायूत आशक्तपणा येतो.
- दुग्धज्वर आजार होतो. प्रजननासंबंधी समस्या उद्धभवतात.
- लहान जनावरांत मुडदूस, तर प्रौढ जनावरात उरमोडी होते.
कारणे
- चारा, खाद्यात कॅल्शिअमचे प्रमाण कमी असणे
- जमिनीत कॅल्शिअमचे प्रमाण कमी असल्यास अशा जमिनीतून उत्पादित चाऱ्यात कॅल्शिअमचे प्रमाण कमी असते.
- कडधान्यात कॅल्शिअमचे प्रमाण कमी असते.
कॅल्शिअमचे शोषण कमी प्रमाणात होणे
- आहारात कॅल्शिअम : स्फुरदाचे प्रमाण २:१ नसणे
- आतड्यांचे आजार
- ड जीवनसत्त्वाचा आभाव
- आहारात ऑक्सालेटचे प्रमाण अधिक असणे.
- चार कमी खाणे अथवा न खाणे
- अल्कलीयुक्त आहार
- हाडांमधून कमी प्रमाणात होणारी कॅल्शिअमची हालचाल ः
- पॅराथॉर्मोनची कमतरता
- रक्तातील कॅल्सिटॉनिनचे अधिक प्रमाण
कॅल्शिअमची वाढती गरज
- गरोदरपणात गर्भवाढीसाठी- गाभण जनावरात
- दूध उत्पादनासाठी-दुभत्या जनावरात
- शरीरवाढीसाठी-वाढत्या जनावरात (वासरे, करडे इ.)
उपाययोजना
- दैनंदिन पशुखाद्यातून मोठया जनावरास ५० ते १०० ग्रॅम, तर लहान जनावरास १५ ते २० ग्रॅम कॅल्शिअमयुक्त क्षार मिश्रणे द्यावीत. (गाभणकाळाच्या शेवटच्या १५ ते २० दिवसात कमी कॅल्शिअमयुक्त आहार द्यावा.)
- आहारात लसूणघास तसेच द्विदलवर्गीय चाऱ्याचा समावेश करावा.
- पचनव्यवस्था नीट राहण्यासाठी जनावराचा नियमित व्यायाम होईल याची काळजी घ्यावी.
- जनावर विण्याअगोदर १० ते १२ दिवस आधी ड जीवनसत्त्वाचे इंजेक्शन पशुवैद्यकाच्या मदतीने द्यावे.
आहारातील अतिप्रमाणातील कॅल्शिअमचे दुष्परिणाम
- जनावरांच्या शरीर संवर्धनासाठी कॅल्शिअमची गरज असली तरी त्याचे गरजेपेक्षा अधिक प्रमाण जनावरांच्या शरीरात झाल्यास जनावरांच्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात.
- हृदयाच्या ठोक्यांची संख्या वाढते, जनावर थरथरते, पडते, जनावरास श्वसनाचा त्रास होतो, तसेच काही वेळी जनावर मृत्युमुखी पडते.
कॅल्शिअमचे दुष्परिणाम टाळण्यासाठी
- कॅल्शिअमची अतिमात्रा देण्याचे टाळावे.
- विनाकारण, सतत कॅल्शिअमचे इंजेक्शन देण्याचे टाळावे. विषामुळे रक्तदोष झालेल्या जनावरास कॅल्शिअम शिरेतून न देता कातडीखाली द्यावे.
- कॅल्शिअम शिरेतून देताना जनावर शांत उभे राहील याची काळजी घ्यावी.
- कॅल्शिअम देण्याअगोदर ते शरीर तापमानाबरोबर गरम करावे.
- कॅल्शिअमयुक्त द्रावणात कचरा, बुरशीजन्य वाढ नसावी.
- कॅल्शिअम देताना पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.
संपर्क ः अजय गवळी,८००७४४१७०२
(लेखक पशुसंवर्धन विषयातील तज्ज्ञ आहेत)

0 comments:
Post a Comment