Friday, November 23, 2018

आरोग्यवर्धक फळांची भुकटी

प्रक्रिया उद्योगामध्ये ग्राहकांच्या आवडीनुसार अणि मागणीनुसार उत्पादनांची निर्मिती करावी लागते. जशी ग्राहकांची मागणी बदलते, त्या पद्धतीने उत्पादनाची पद्धतही बदलत आहे. पोलंड येथील पोलिश ॲकॅडमी आॅफ सायन्स या संशोधन संस्थेतील तज्ज्ञांनी फळांच्या भुकटी निर्मितीसाठी विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. या संशोधनामुळे येत्या काळात चार सफरचंद खाण्यामुळे जेवढे पोषक घटक शरीराला मिळतात तेवढेच पोषक घटक दोन चमचे सफरचंदाच्या भुकटीतून मिळू शकतील. परिणामी जीवनसत्त्वे व रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे घटकही त्यातून उपलब्ध होतील. आरोग्यवर्धक गुणधर्मामुळे ताज्या फळांसोबतच फळांच्या भुकटीलाही भविष्यात चांगली मागणी असणार आहे.

फळांच्या पावडरीचे गुणधर्म

  • सध्या उपलब्ध असणाऱ्या फळांच्या पावडरीमध्ये ३० ते ६० टक्के फळांतील घटक असतात; परंतु आता नवीन संशोधनाच्या माध्यमातून फळांतील शंभर टक्के घटक भुकटीमध्ये उपलब्ध होतील, असा तज्ज्ञांना विश्वास आहे.
  • या संशोधनामुळे वर्षभर हंगामी फळांची उपलब्धता होईल. ग्राहकांना वर्षभर त्या फळाचा स्वाद चाखणे शक्य होणार आहे.
  • सध्याच्या पावडरनिर्मिती प्रक्रियेमध्ये फळातील काही उपयुक्त गुणधर्म नष्ट होतात. हे लक्षात घेऊन नवीन संशोधनानुसार वैशिष्ट्यपूर्ण वाळवणी प्रक्रियांचा वापर केला आहे. फळांमधील बहुतांश चांगले घटक पावडरीमध्ये रूपांतरीत होणार आहेत.
  • सध्या संशोधन संस्थेतील तज्ज्ञ सफरचंद, प्लम, चोकोबेरीज, क्रॅनबेरीज या फळांच्या पावडर निर्मितीबाबत संशोधन करीत आहेत.
News Item ID: 
18-news_story-1542976420
Mobile Device Headline: 
आरोग्यवर्धक फळांची भुकटी
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

प्रक्रिया उद्योगामध्ये ग्राहकांच्या आवडीनुसार अणि मागणीनुसार उत्पादनांची निर्मिती करावी लागते. जशी ग्राहकांची मागणी बदलते, त्या पद्धतीने उत्पादनाची पद्धतही बदलत आहे. पोलंड येथील पोलिश ॲकॅडमी आॅफ सायन्स या संशोधन संस्थेतील तज्ज्ञांनी फळांच्या भुकटी निर्मितीसाठी विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. या संशोधनामुळे येत्या काळात चार सफरचंद खाण्यामुळे जेवढे पोषक घटक शरीराला मिळतात तेवढेच पोषक घटक दोन चमचे सफरचंदाच्या भुकटीतून मिळू शकतील. परिणामी जीवनसत्त्वे व रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे घटकही त्यातून उपलब्ध होतील. आरोग्यवर्धक गुणधर्मामुळे ताज्या फळांसोबतच फळांच्या भुकटीलाही भविष्यात चांगली मागणी असणार आहे.

फळांच्या पावडरीचे गुणधर्म

  • सध्या उपलब्ध असणाऱ्या फळांच्या पावडरीमध्ये ३० ते ६० टक्के फळांतील घटक असतात; परंतु आता नवीन संशोधनाच्या माध्यमातून फळांतील शंभर टक्के घटक भुकटीमध्ये उपलब्ध होतील, असा तज्ज्ञांना विश्वास आहे.
  • या संशोधनामुळे वर्षभर हंगामी फळांची उपलब्धता होईल. ग्राहकांना वर्षभर त्या फळाचा स्वाद चाखणे शक्य होणार आहे.
  • सध्याच्या पावडरनिर्मिती प्रक्रियेमध्ये फळातील काही उपयुक्त गुणधर्म नष्ट होतात. हे लक्षात घेऊन नवीन संशोधनानुसार वैशिष्ट्यपूर्ण वाळवणी प्रक्रियांचा वापर केला आहे. फळांमधील बहुतांश चांगले घटक पावडरीमध्ये रूपांतरीत होणार आहेत.
  • सध्या संशोधन संस्थेतील तज्ज्ञ सफरचंद, प्लम, चोकोबेरीज, क्रॅनबेरीज या फळांच्या पावडर निर्मितीबाबत संशोधन करीत आहेत.
English Headline: 
agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, making of Fruit powder
वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
पोलंड, सफरचंद, apple
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment