Wednesday, November 21, 2018

कांद्याच्या बाजारातील चढउताराचा शेतकऱ्यांना फटका

जळगाव : खानदेशात कांद्याची आवक बाजारांमध्ये काहीशी वाढल्याने कांद्याचे दर दबावात आले आहेत. दरवाढीच्या मागणीसंबंधी शेतकऱ्यांनी पिंपळनेर व धुळे येथील बाजारात नाराजी व्यक्त केली. यामुळे लिलाव बंद करण्याची वेळ आली होती. सध्या लाल कांद्याला सरासरी १००० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत. याचा फटका बसत असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.

जळगाव बाजार समितीत मागील तीन-चार दिवस सरासरी ६०० क्विंटल नव्या व जुन्या लाल कांद्याची आवक झाली. किमान दर ६०० व कमाल दर १००० रुपयांपर्यंत आहेत. नव्या लाल कांद्याला ५०० रुपये मणपर्यंतचे दर मिळाले.
कांद्याची आवक मागील आठवड्यात वाढली. तसे दर दबावात आले. या महिन्याच्या सुरवातीला नव्या लाल कांद्याला किमान ८०० व कमाल १४०० रुपये प्रतिक्विंटलचे दर होते.

धुळे बाजार समितीमध्येही नव्या लाल कांद्याला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलचे दर होते. अशात साठविलेल्या जुन्या लाल कांद्याची आवक बाजारात सुरू झाली. धुळे व जळगाव बाजार समितीत जुन्या लाल कांद्याला ४०० ते १००० रुपये दर या महिन्याच्या सुरवातीला होते.

सद्यःस्थितीत जुन्या लाल कांद्याला किमान ४०० व कमाल ८०० रुपये दर आहेत. आवक कायम असून, दरात सतत चढउतार होत आहेत. कांदा बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या अडावद (ता. चोपडा) व किनगाव (ता. यावल) येथेही दर सतत कमी अधिक होत आहेत. अडावद बाजारातही प्रतिमण ४०० रुपयांपर्यंतचे दर मागील दोन दिवस काही शेतकऱ्यांना मिळाल्याची माहिती मिळाली.

मध्य प्रदेशच्या निवडणुकीचा परिणाम
सध्या मध्य प्रदेशात निवडणूक प्रचार जोमात सुरू आहे. खानदेशातील धुळे, चोपडा, शिरपूर, शहादा, यावल भागातील अनेक शेतकरी मध्य प्रदेशातील इंदूर येथील बाजारात कांदा विक्रीसाठी नेतात. पण तेथे दरांवर दबाव आहे. अशीच स्थिती स्थानिक बाजारात असल्याने शेतकरी धुळे, पिंपळनेर (ता. साक्री), अडावद व जळगाव येथील बाजारात कांदा विक्री करीत आहेत, असे सांगण्यात आले.

News Item ID: 
18-news_story-1542807071
Mobile Device Headline: 
कांद्याच्या बाजारातील चढउताराचा शेतकऱ्यांना फटका
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi, The onion fluctuations of the onion market hit farmers
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
जळगाव, Jangaon, खानदेश, धुळे, Dhule, वन, forest, बाजार समिती, agriculture Market Committee, मध्य प्रदेश, Madhya Pradesh, निवडणूक
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment