Saturday, December 15, 2018

केळी सल्ला

केळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असणे आवश्यक असते. केळीच्या वाढीच्या विविध अवस्थांनुसार कंद उगवण्यासाठी १६ ते ३० अंश सेल्सिअस, पाने व फळांच्या योग्य वाढीसाठी २६ ते ३० अंश सेल्सिअस, केळफूल योग्यरित्या बाहेर पडण्यासाठी २२ ते २५ अंश सेल्सिअस, तसेच योग्य प्रामाणात अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी १२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान आवश्यक असते. मात्र हिवाळ्यामध्ये डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात किमान तापमान १६ अंशापेक्षाही खाली जाते. यामुळे केळी पिकावर अनेकविध प्रातिकूल परिणाम होतात.

उपाययोजना

  • केळी पिकाची शिफारस केलेल्या अंतरावर म्हणजेच ५ × ५ फूट अंतरावरच लागवड करावी. जास्त अंतरावर लागवड करणे टाळावे. थंड वातावरणात केळी लागवड करणे टाळावे.
  • लागवडीच्या वेळेस चोहोबाजूने सुरू, नेपियर गवत, शेवरी, इत्यादी वारा प्रातिरोधक वनस्पतींची दाट २ ते ­३ ओळीत लागवड करावी. वारा प्रातिरोधक वनस्पतींमुळे बागेचे थंड वाऱ्यापासून संरक्षण होते.
  • रासायनिक खतांच्या शिफारशीत मात्रा द्याव्यात. पालाश या प्रामुख अन्नद्रव्याची कमतरता पडू देऊ नये.
  • बागेस रात्री अथवा पहाटेच्या वेळेस ठिबक संचाने पाणीपुरवठा करावा.
  • जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढण्याकरिता शिफारशीनूसार लागवडीपूर्वी शेणखत अथवा कंपोस्ट खत द्यावे.|
  • केळीची लोंबणारी हिरवी निरोगी तसेच वाळलेली मात्र रोगाचा प्रादुर्भाव नसलेली पाने खोडाभोवती तशीच लपेटून ठेवावीत. अशी पाने शक्यतो हिवाळ्यात कापू नयेत. फक्त रोगग्रास्त पानेच कापावीत.
  • थंडीच्या दिवसात केळीच्या पानांच्या खालच्या बाजूस जांभळट रंगाच्या छटा दिसू लागतात. या छटा जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे दिसू लागतात. यासाठी झिंक सल्फेटची ०.५ टक्के (५ ग्रॅम प्रती लिटर) या प्रमाणात फवारणी करावी.
  • प्रात्येक झाडास वाढीनुसार अर्धा ते एक किलो निंबोळी खत मातीत मिसळून द्यावे. यामुळे पिकास अतिरिक्त अन्नद्रव्य उपलब्ध होतात. तसेच निंबोळी खत कुजताना उष्णता निर्माण होऊन जमिनीतील तापमान वाढून मुळांची कार्यक्षमता कायम राखण्यास मदत होते. तसेच निंबोळी ढेपेमुळे मुळ्यांना इजा करणाऱ्या­ सुत्रकॄमींपासूनही पिकाचे संरक्षण होते.
  • पिकामध्ये उसाचे पाचट, केळीची वाळलेली पाने, सोयाबीन भुसा असे सेंद्रिय पदार्थ अथवा चंदेरी रंगाच्या पॉलीप्रोपीलीन कागदाचे आच्छादन करावे. यामुळे जमिनीतील आवश्यक तापमान टिकून राहते तसेच सूक्ष्म जिवाणूंच्या संख्येमध्येही वाढ होण्यास मदत होते.
  • घडाची योग्य वाढ व पक्वता याकरिता शेवटची फणी उमलल्यानंतर त्वरित केळफूल कापून बागेबाहेर न्यावे व नष्ट करावे. घडावर अतिरिक्त फण्या न ठेवता अपूर्ण व अतिरिक्त फण्यांची वेळीच विरळणी करावी. केळफूल कापणीनंतर घडावर ०.५ टक्के (५ ग्रॅम प्रती लिटर) पोटॅशिअम डाय हायड्रोजन फॉस्फेट व १.० टक्के युरिया यांच्या एकत्रित द्रावणाची १५ दिवसांच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. यामुळे घडांचे वजन वाढते व घड लवकर काढणीस येतो.
  • फळांच्या चांगल्या वाढीसाठी केळफूल कापणी, फण्यांची विरळणी व रसायनांची घडावर फवारणी झाल्यानंतर घड ७५× १०० सेमी आकारमानाच्या २ टक्के सच्छिद्र पॉलीप्रोपीलीन पिशव्यांनी झाकावा. यामुळे घडाचे थंड हवा, धूळ, पाणी, दव यांपासून संरक्षण होते. त्याचबरोबर घडाभोवती सूक्ष्म वातावरण निर्माण होऊन घड लवकर पक्व होतो.
  • हिवाळ्यात करपा (सीगाटोका) यासारख्या बुरशीजन्य रोगांच्या प्राभावी नियंत्रणासाठी बाग नियमितपणे स्वच्छ ठेवावी तसेच कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा प्राॅपीकोनॅझोल १ मिली प्रती लिटर याप्रमाणात बुरशीनाशकांची फवारणी करावी.
  • तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्यास पहाटेच्या वेळेस बागेभोवती चोहोबाजूंनी ओला काडीकचरा व गवत जाळून बागेमध्ये धूर करावा. अशाप्रकारे हिवाळ्यात केळी बागेची काळजी घेतल्यास थंडीमुळे होणा­ऱ्या संभाव्य नुकसानाची पातळी कमी करण्यास हमखास मदत होइल.

 ः प्रा. एन. बी. शेख, ०२५७/२२५०९८६  
(केळी संशोधन केंद्र, जळगाव.)  

News Item ID: 
18-news_story-1544854670
Mobile Device Headline: 
केळी सल्ला
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agricultural stories in Marathi, agrowon, banana fruit crop advice
Author Type: 
External Author
प्रा. एन. बी. शेख, प्रा. के. बी. पवार
Search Functional Tags: 
किमान तापमान, कमाल तापमान, केळी, Banana, नेपियर, Napier, रासायनिक खत, Chemical Fertiliser, खत, Fertiliser, पाणी, Water, थंडी, सोयाबीन
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment