Wednesday, January 23, 2019

बांबूपासून एकरी तीन लाखांचे उत्पन्न

कणकवली - पारंपरिक पद्धतीने बांबू लागवड करण्यापेक्षा कांडीच्या पुनर्लागवडीपासून कमी कष्टात आणि कमी वेळात उत्पादन घेता येते. या बांबू लागवडीपासून एकरी ३ लाख रुपये एवढे उत्पन्नही मिळविता येत असल्याचे ओरोस येथील प्रगतिशील शेतकरी दत्ताराम खोत यांनी दाखवून दिले. खोत यांनी सहा एकर क्षेत्रात बांबू, मिरीची लागवड केली आहे.

खोत गेली १० वर्षे आपल्या शेतामध्ये विविध प्रयोग करीत आहेत. यात त्यांना बांबू लागवडही कमी मेहनतीत जास्त उत्पन्न मिळवून देणारी शेती असल्याचे लक्षात आले. कोकणातील हवामान आणि जमीनही बांबू  लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे येथे बांबूचे उत्पादन घेण्यासाठी त्यांनी दहा वर्षापासून ६ एकर क्षेत्रात माणगा, टम या दोन जातीच्या बांबूची लागवड सुरू केली.

या बांबूला प्रतिबांबू ४० ते ५० रूपये असा दर मिळत आहे. तर बांबू लागवडीत एक एकर क्षेत्रापासून ३ लाख रूपये नफा होत असल्याचेही खोत यांनी सांगितले. तसेच सध्या हस्तकला, शेती, फर्निचर, खाद्य, बांधकाम, विविध वस्तू, वाद्यनिर्मिती, कागद उद्योग यांच्यासाठी बांबूचा उपयोग होतो. त्यामुळे बांबू लागवड करून शेतकऱ्यांनी आपल्या उन्नतीसाठी प्रयत्न करायला हरकत नाही. वर्षानुवर्षे दुर्लक्षित जमिनीवर बांबू लागवड होऊ शकते. शिवाय बांबूसाठी खतपाणी घालावे लागत नाही व निगा राखावी लागत नाही.

कोकणात मोठ्या प्रमाणात पडिक जमिनी आहेत. इथले बहुतेक जमीनमालक हे मुंबईत राहतात. या पडिक जमिनीमध्ये बांबू लागवड केल्यास आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ होईल. तसेच बांबू लागवडीतून जमीनीची धूप थांबवता येईल, असे खोत म्हणाले. याखेरीज मिरी लागवडीतूनही अधिक उत्पन्न मिळू शकते अशी माहिती त्यांनी दिली.

सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांत बांबू लागवडीपासून कमी श्रमात आणि कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवता येत आहे. इथल्या शेतकऱ्यांना बांबू हा नगदी पिकाचा चांगला पर्याय मिळाला आहे. बांबू लागवडीसाठी कृषी विभाग, बॅंका व वनविभाग यांनी पाठबळ मिळाल्यास शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती वेगाने होण्यास निश्‍चितपणे मदत होईल.
- दत्ताराम खोत,
प्रगतिशील शेतकरी ओरोस

News Item ID: 
51-news_story-1548312540
Mobile Device Headline: 
बांबूपासून एकरी तीन लाखांचे उत्पन्न
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
three lakh rs profit form Bamboo Cultivation
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment