यवतमाळ : तूर दराच्या चढउतारानंतर बाजार समितीच्या आवकेवर परिणाम झाला. बाजार समितीत रोज तीन हजार क्विंटल तुरीची आवक होत होती. मात्र दर कमी झाल्याने ती अवघ्या ९०० क्विंटलवर पोचली आहे.
शासनाने यंदा तुरीचे हमीभाव पाच हजारांच्यावर जाहीर केले. बाजारातही शनिवारपर्यंत समाधानकारक दर मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर बाजारात विक्रीसाठी आणली. तुरीची आवक वाढल्याने सोमवारी (ता.२१) अचानक तुरीचे दर ५,४०० रुपयांवरून ४,७०० रुपयांपर्यंत खाली आले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांची खरेदी बंद पाडली. बाजार समिती सभापती, तहसीलदार, जिल्हा निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची बाजू ऐकली. त्यानंतर दरात काहीशी तेजी आली. ४,९०० ते ५,२४० रुपयांपर्यंत ते पोचले.
दरात काहीशी तेजी असली तरी ते हमीभावाच्या खालीच असल्याने शेतकऱ्यांनी आता वेट ॲण्ड वॉचच्या भुमिकेतून तूर बाजारात आणलीच नाही. त्यामुळे बाजरात तुरीच्या आवकेवर मोठा परिणाम झाला.
शेतकऱ्यांना दर सुधारण्याची प्रतीक्षा
बाजार समितीत तुरीचे दर व्यापाऱ्यांनी पाडले. परिणामी तीन हजार क्विंटलपेक्षा अधिक तुरीची आवक होणाऱ्या बाजारात आता केवळ ८५० ते ९०० क्विंटल तूर पोचत आहे. दरातील तेजीचा अंदाज घेऊन शेतकरी आता बाजारात तूर आणतील, असे सांगण्यात आले.

0 comments:
Post a Comment