Thursday, February 28, 2019

राज्यात ढोबळी मिरची १००० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल

पुण्यात ३५० ते ४५० रुपये प्रति दहा किलो
पुणे ः गुलटेकडी येथील पुणे (हवेली) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २८) सिमला मिरचीची सुमारे १० टेम्पो आवक झाली होती. या वेळी दहा किलोला ३५० ते ४५० रुपये दर होता. दुष्काळी परिस्थितीमुळे आवक बेताची असून, दर देखील सरासरीपेक्षा वाढलेले असल्याचे ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी सांगितले. दरम्यान ढोबळी मिरचीची आवक ही प्रामुख्याने पुणे विभागातील विविध जिल्ह्यांमधून होत आहे. मात्र, सध्या सर्वच जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने आवक कमी असून, दर वाढलेलेच असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले.

कोल्हापुरात २५० ते ४०० रुपये प्रति दहा किलो
कोल्हापूर : येथील बाजार समितीत ढोबळी मिरचीची पाचशे ते सहाशे पोती आवक सुरू आहे. प्रति दहा किलोस २५० ते ४०० रुपये इतका दर मिळत आहे. दर गेल्या आठवड्यापासून स्थिर असल्याची माहिती भाजीपाला विभागातील सूत्रांनी  दिली. बाजार समितीत हातकणंगले शिरोळ तालुक्यातून आवक होते. गेल्या पंधरवड्यापासून आवक स्थिर आहे. ढोबळी मिरचीस २०० ते ४०० रुपयांपर्यंत दर सातत्याने मिळत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. येत्या काही दिवसांमध्ये सांगली जिल्ह्यातील भाजीपाला पट्ट्यातून मिरचीची आवक वाढण्याची शक्यता असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. काहीसे ढगाळ हवामान असल्याने मिरचीचे व्यवस्थापन करताना शेतकऱ्यांची कसरत होत आहे.

औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल २५०० ते २८०० रुपये

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २८) ढोबळ्या मिरचीची २३ क्‍विंटल आवक झाली. या मिरचीला २५०० ते २८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ३१ जानेवारी २०१९ ला ४५ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीला १००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २ फेब्रुवारीला २८ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीचे दर २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ५ फेब्रुवारीला ढोबळ्या मिरचीची आवक ५७ क्‍विंटल   तर दर १४०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ७ फेब्रुवारीला ५७ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या   मिरचीला १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १४ फेब्रुवारीला ढोबळ्या मिरचीची आवक २३ क्‍विंटल तर दर २००० ते २८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १६ फेब्रुवारीला ३० क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीचे दर १५०० ते २८०० रुपये प्रतिक्‍वंटल राहिले. २० फेब्रुवारीला ढोबळ्या मिरचीची आवक २९ क्‍विंटल, तर दर २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २४ फेब्रुवारीला ६७ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीचे दर २५०० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटल होते. २५ फेब्रुवारीला ३३ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीला २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

अकोल्यात प्रतिक्विंटल १५०० ते २२०० रुपये
अकोला ः येथील बाजारात सिमला मिरचीची राज्यातील विविध भागातून अावक होते. सध्या ही मिरची कमीत कमी १५०० व जास्तीत जास्त २२०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत अाहे. बाजारपेठेत एक टनापर्यंत मर्यादित अावक सध्या होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सिमला मिरचीचे क्षेत्र या भागात कमी अाहे. त्यामुळे येथील बाजारात विक्रीसाठी प्रामुख्याने नाशिकसह इतर भागातून सिमला मिरचीची अावक होत असते. सध्या दुय्यम दर्जाची सिमला १५०० ते १८०० रुपये क्विंटल दराने विकत आहे. उत्कृष्ट दर्जाची सिमला १८०० ते २२०० दरम्यान विक्री होत अाहे. किरकोळ बाजारात ही मिरची ४० ते ५० रुपये प्रतिकिलोने ग्राहकांना विक्री केली जाते. सध्या अावक मर्यादित असली तरी मागणी तेवढी अधिक नसल्याने दर स्थिर असल्याचेही सूत्रांचे म्हणणे होते. अावक वाढल्यास दरांवर परिणामाची शक्यता अाहे.

सांगलीत ३०० ते ४०० रुपये प्रति दहा किलो
सांगली ः येथील शिवाजी मंडईत गेल्या आठवड्यापासून सिमला मिरचीची आवक कमी झाली आहे. गुरुवारी (ता. २८) सिमला मिरचीची ५०० ते ८०० किलोची आवक झाली होती. त्यास प्रतिदहा किलोस ३०० ते ४०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. शिवाजी मंडईत सिमला मिरचीची सांगली जिल्ह्यातील वाळवा, आष्टा, तुंग, कवठेपिरान, मिरज, दुधगाव, या परिसरातून आवक होते. बुधवारी (ता. २७) सिमला मिरचीची ५०० ते ८०० किलोची आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोस २५० ते ३०० रुपये असा दर होता. मंगळवारी (ता. २६) सिमला मिरचीची ५०० ते ७०० किलोची आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोस ३०० ते ४०० रुपये असा दर होता. सोमवारी (ता. २५) सिमला मिरचीची ५०० ते ८०० किलोची आवक झाली असून त्यास प्रतिकिलोस ३०० ते ४०० रुपये असा दर होता. सिमला मिरचीची आवक जरी कमी झाली असली तर दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी वर्गाने दिली.

सोलापुरात प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये
सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात ढोबळी मिरचीची आवक कमीच राहिली. पण मागणी असल्याने दरामध्ये तेजी राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात ढोबळी मिरचीची आवक अगदीच कमी होत आहे. रोज १० ते २० क्विंटलपर्यंत आवक राहिली, पण मागणी चांगली राहिली. ढोबळी मिरचीला प्रतिक्विंटल किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि कमाल २००० रुपये असा दर राहिला. या आधीच्या सप्ताहातही अशीच स्थिती राहिली. आवकही रोज जेमतेम ७ ते १० क्विंटलपर्यंत राहिली. तर दर प्रतिक्विंटलला किमान १२०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि कमाल २५०० रुपये असा दर राहिला. फेब्रुवारीच्या पहिल्या सप्ताहात हीच आवक रोज १० ते १२ क्विंटलपर्यंत होती. तर दर प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि कमाल २२०० रुपये असा दर मिळाला. गेल्या दोन-तीन आठवड्यात किंचित चढ-उतार वगळता दरातील तेजी टिकून राहिल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले.

परभणीत प्रतिक्विंटल २२०० ते २७०० रुपये
परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. २८) ढोबळी मिरचीची १० क्विंटल आवक होती. ढोबळी मिरचीला प्रतिक्विंटल २२०० ते २७०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या येथील भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून तसेच नाशिक जिल्ह्यातून ढोबळ्या मिरचीची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी ढोबळी मिरचीची ६ ते १० क्विंटल आवक होती. त्या वेळी सरासरी प्रतिक्विंटल २००० ते ३२०० दर मिळाले. गुरुवारी (ता. २८) ढोबळी मिरचीची १० क्विंटल आवक झाली असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये होते. तर किरकोळ विक्री प्रतिकिलो ४० ते ६० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

News Item ID: 
18-news_story-1551363590
Mobile Device Headline: 
राज्यात ढोबळी मिरची १००० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in Marathi, State in capsicum 10000 to 4500 rupes per quintal
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
पुणे, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, ढोबळी मिरची, capsicum, कोल्हापूर, Hatkanangale, सांगली, Sangli, Aurangabad, नाशिक, Nashik, सोलापूर, परभणी
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment