१) सध्याच्या थंडीमुळे नवीन लागवड केलेल्या रोपांच्या वाढीवर परिणाम होतो. काहीवेळा पाने उमलण्यास वेळ लागतो. पाने पिवळी पडतात. जमिनीतून अन्नद्रव्य उचलण्याचा वेग मंदावून झाडाच्या वाढीवर परिणाम होतो.
उपाययोजना ः
१) सध्याच्या काळात १९ः१९ः१९ हे खत २० ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे अन्नद्रव्यांचा पुरवठा होण्यास वेग वाढतो. त्याचा झाडांच्या वाढीसाठी चांगला परिणाम होतो.
२) बागेत पहाटे किंवा रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे.
३) तीन ते चार महिने वयाच्या झाडाला २०० ग्रॅम आणि सहा महिने वयाच्या पुढील झाडाला अर्धा किलो निंबोळी पेंड आळ्यात मिसळून द्यावी. यामुळे मुळांच्या कार्यक्षेत्रात उबदारपणा वाढतो.
४) पहाटेच्या वेळेस बागेत शेकोटी करून धूर करावा. यामुळे बागेतील तापमान वाढण्यास मदत होते.
५) बागेच्या कडेने शेडनेट लावल्याने थंड वारे शिरण्यास अडथळा तयार होतो.
संपर्क ः ०२५७- २२५०९८६
- प्रा. एन. बी. शेख,
केळी संशोधन केंद्र, जळगाव

0 comments:
Post a Comment