Monday, February 11, 2019

वाढत्या थंडीपासून द्राक्षबागेचे संरक्षण

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील तापमान अचानक पुन्हा कमी झाले आहे. मध्यंतरी कमी झालेल्या थंडीच्या पार्श्वभूमीवर अचानक वाढलेल्या थंडीचे द्राक्ष बागांवर परिणाम दिसून येतील.

विशेषतः माळरानावरील हलक्या जमिनीचा भाग, तसेच नदी, तलाव किंवा नाले असे पाण्याचे स्रोत जवळ असलेल्या व खोलगट भागात तापमान अधिक घटू शकते. नाशिकसह राज्याच्या काही ठिकाणी हे तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षाही खाली जाऊ शकेल. अशा भागांमध्ये बागेला थंडीमुळे नुकसान पोचू शकते. बागायतदारांनी आपल्या बागेतील तापमान मोजून अंदाज घ्यावा. त्यानुसार योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

१) ज्या ठिकाणी तापमान ४ -५ अंशापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी पहाटे लवकर बागेच्या जवळपास शेकोट्या पेटवाव्यात. ज्या दिशेने बागेकडे हवा येते, त्या दिशेला शेकोटी पेटवल्यास बागेतील तापमान वाढते. विशेषतः खोलगट भागामध्ये अशी काळजी घेतल्यास बागेचे अतिथंडीपासून बचाव होण्यास मदत होते.

२) सिलिसिलिक अॅसिड आधारित सिलिकॉन पानांवर फवारल्यास त्यातून सिलिकॉन हे अन्नद्रव्य झाडांना मिळते. सिलिकॉन पानांची व मण्यांची थंडीविरुद्धची प्रतिकारक क्षमता वाढवते. सर्व विभागामध्ये पहाटे काही काळ तापमान कमी राहणे व त्यानंतर सूर्योदयानंतर ते वेगाने वाढणे या दोन्ही गोष्टीमुळे नुकसान होण्याची शक्यता असते. विशेषतः जीए, सीपीपीयू, ब्रासिनोस्टेरॉईड्स, सीवीड एक्स्ट्रॅक्ट (सागरी शैवाळाआधारित टॉनिक्स), अमिनो अॅसिड फवारलेल्या बागांमध्ये नुकसानीचा जास्त धोका असतो.

३) कायटोसॅन २ ते ३ ग्रॅम प्रतिलिटर प्रमाणामध्ये फवारल्यास पानांवर किंवा घडांवर सूक्ष्म आवरण तयार होते. त्यामुळे थंडीपासून संरक्षण होते. कायटोसॅन वापरलेल्या बागांमध्ये भुरीच्या नियंत्रणासाठी अॅम्पिलोमायसिस या जैविक नियंत्रणासाठी वापरलेले फॉरम्युलेशन्स फवारल्यास चांगल्या प्रकारे काम करते. भुरीचे नियंत्रण चांगल्या प्रकारे मिळू शकते.

४) थंडीच्या काळात बाष्पोत्सर्जनाचा (पानातून होणाऱ्या बाष्पीभवनाचा) वेग कमी होतो. अशा वेळी मुळातून दिल्या जाणाऱ्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे.

५) सध्याच्या वातावरणामध्ये तसे पाहता कोणताही रोग जास्त वाढणार नाही. परंतु, वातावरण ढगाळ राहिल्यास व कॅनोपिमध्ये आर्द्रता वाढल्यास भुरी वाढू शकते. या भुरीच्या नियंत्रणासाठी नियमितपणे सल्फर (८० डब्ल्यूजी) दीड ते दोन ग्रॅम प्रतिलिटर व अॅम्पिलोमायसिस ८ ते १० मिलि प्रतिलिटर आलटून पालटून फवारलेले असल्यास बागेमध्ये भुरी वाढणार नाही.

News Item ID: 
18-news_story-1549718001
Mobile Device Headline: 
वाढत्या थंडीपासून द्राक्षबागेचे संरक्षण
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agricultural stories in Marathi, agrowon, GRAPES ADVICE for cold
Author Type: 
External Author
डॉ. एस. डी. सावंत
Search Functional Tags: 
थंडी, द्राक्ष, विभाग, Sections, सूर्य
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment