Monday, February 25, 2019

कोल्हापुरात टोमॅटो ५० ते १७० रुपये प्रतिदहा किलो

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोची दीड ते दोन हजार कॅरेट इतकी आवक होती. टोमॅटोस दहा किलोस ५० ते १७० रुपये दर मिळाला. टोमॅटोचे दर स्थिर असल्याची माहिती बाजार समितीतून देण्यात आली. ओल्या मिरचीची तीनशे ते चारशे पोती आवक होती. ओल्या मिरचीस दहा किलोस २०० ते ५०० रुपये दर होता. ढोबळी मिरचीची तीनशे ते चारशे पोती आवक होती. ढोबळी मिरचीस दहा किलोस १३० ते ४०० रुपये दर होता. भेंडीच्या आवकेत वाढ होती. वांग्याची दोनशे ते तीनशे बॉक्‍स आवक होती. वांग्यास दहा किलोस ५० ते २५० रुपये दर मिळाला. 

भेंडीस दहा किलोस १०० ते ४५० रुपये दर मिळाला. वरण्याची चाळीस ते पन्नास पोती आवक होती. वरण्यास दहा किलोस २३० ते ३३० रुपये दर होता. गाजराची दीडशे ते दोनशे पोती आवक होती. गाजराची आवक प्रामुख्याने सांगली भागातून सुरू होती. गाजरास दहा किलोस ५० ते २०० रुपये दर मिळाला. मका कणसास शेकडा २०० ते २५० रुपये दर होता. सांगली जिल्ह्यातून शेवगा शेंगेची आवक होत आहे. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत ती कमी असल्याचे सांगण्यात आले. शेवगा शेंगेस दहा किलोस ३०० ते ४०० रुपये दर होता. 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीस शेकडा २५० ते ३०० रुपये दर होता. कोथिंबिरीची तेरा ते चौदा हजार पेंढ्या आवक होती. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मेथी, पालक, पोकळा शेपूस शेकडा दोनशे ते तीनशे रुपये दर होता. फळांमध्ये द्राक्षाच्या आवकेत या सप्ताहात वाढ झाल्याचे फळ विभागातील सूत्रांनी सांगितले. द्राक्षास किलोस २० ते ३० रुपये दर मिळाला. डाळिंबास किलोला ५ ते ३० रुपये दर होता.

News Item ID: 
18-news_story-1551099699
Mobile Device Headline: 
कोल्हापुरात टोमॅटो ५० ते १७० रुपये प्रतिदहा किलो
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोची दीड ते दोन हजार कॅरेट इतकी आवक होती. टोमॅटोस दहा किलोस ५० ते १७० रुपये दर मिळाला. टोमॅटोचे दर स्थिर असल्याची माहिती बाजार समितीतून देण्यात आली. ओल्या मिरचीची तीनशे ते चारशे पोती आवक होती. ओल्या मिरचीस दहा किलोस २०० ते ५०० रुपये दर होता. ढोबळी मिरचीची तीनशे ते चारशे पोती आवक होती. ढोबळी मिरचीस दहा किलोस १३० ते ४०० रुपये दर होता. भेंडीच्या आवकेत वाढ होती. वांग्याची दोनशे ते तीनशे बॉक्‍स आवक होती. वांग्यास दहा किलोस ५० ते २५० रुपये दर मिळाला. 

भेंडीस दहा किलोस १०० ते ४५० रुपये दर मिळाला. वरण्याची चाळीस ते पन्नास पोती आवक होती. वरण्यास दहा किलोस २३० ते ३३० रुपये दर होता. गाजराची दीडशे ते दोनशे पोती आवक होती. गाजराची आवक प्रामुख्याने सांगली भागातून सुरू होती. गाजरास दहा किलोस ५० ते २०० रुपये दर मिळाला. मका कणसास शेकडा २०० ते २५० रुपये दर होता. सांगली जिल्ह्यातून शेवगा शेंगेची आवक होत आहे. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत ती कमी असल्याचे सांगण्यात आले. शेवगा शेंगेस दहा किलोस ३०० ते ४०० रुपये दर होता. 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीस शेकडा २५० ते ३०० रुपये दर होता. कोथिंबिरीची तेरा ते चौदा हजार पेंढ्या आवक होती. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मेथी, पालक, पोकळा शेपूस शेकडा दोनशे ते तीनशे रुपये दर होता. फळांमध्ये द्राक्षाच्या आवकेत या सप्ताहात वाढ झाल्याचे फळ विभागातील सूत्रांनी सांगितले. द्राक्षास किलोस २० ते ३० रुपये दर मिळाला. डाळिंबास किलोला ५ ते ३० रुपये दर होता.

English Headline: 
agriculture news in Marathi, In Kolhapur, Tomatoes cost between Rs. 50 to 170 per kg
Author Type: 
Internal Author
राजकुमार चौगुले
Search Functional Tags: 
कोल्हापूर, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची, capsicum, भेंडी, सांगली
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment