Wednesday, February 20, 2019

लागवड उन्हाळी तिळाची...

उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन टी-११ या जातींची निवड करावी. पेरणी लवकरात लवकर पाभारीने ३० सें.मी. अंतरावर करावी. पिकाच्या गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

ती ळ लागवडीसाठी चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी
जमीन निवडावी. बियाणे बारीक असल्यामुळे जमीन चांगली तयार करावी. उभी, आडवी वखरणी करावी. शेवटच्या वखरणीच्या वेळेस कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. जमीन चांगली भुसभुशीत करून पठाल फिरवून पेरणी करावी.

  • हेक्टरी २५ किलो नत्र आणि २५ किलो स्फुरदाची आवश्‍यकता आहे. पेरणीच्या वेळेस अर्धे नत्र (१२.५ किलो) आणि पूर्ण स्फुरद (२५ किलो) या खतांची मात्रा द्यावी. उरलेला नत्राचा दुसरा हप्ता (१२.५ किलो) पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावा. पेरणीच्या वेळेस झिंक व सल्फर या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास जमिनीत २० किलो शिफारशीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा दिल्यास उत्पादनात वाढ होते. उन्हाळी हंगामाकरिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास ३ ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी. त्यानंतर ट्रायकोडर्मा व्हिरीडी ४ ग्रॅम या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. पेरणी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी.
  • बियाणे फार बारीक असल्यामुळे त्यात समप्रमाणात वाळू, गाळलेले शेणखत, राख किंवा माती मिसळावी. पाभारीने ३० सें.मी. अंतरावर पेरणी करावी.
  • पेरणीनंतर ७ ते ८ दिवसांनी नांगे भरावेत. पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी पहिली व त्यानंतर ८ दिवसांनी दुसरी विरळणी करून दोन रोपात १० ते १५ सेंमी अंतर ठेवावे.
  • आवश्‍यकतेनुसार २ ते ३ कोळपण्या किंवा खुरपण्या करून पीक एक महिन्याचे होईपर्यंत शेत तणविहरीत ठेवावे.
  • पिकास आवश्‍यकतेनुसार पेरणीपूर्व व पेरणीनंतर त्वरीत व नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे १० ते १५ दिवसांनी ओलीत करावे. ओलीत करताना पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • शिफारशीत जाती ः
  • एकेटी १०१ ः ही जात ४८ दिवसात फुलोऱ्यात येते. ९० ते ९५ दिवसात परिपक्व होते. दाण्याचा रंग पांढरा मळकट असून तेलाचे सरासरी ४८-४९ टक्के आहे. उत्पादन ७ ते ८ क्विंटल प्रति हेक्‍टरी मिळते.
  • पीकेव्ही एन टी-११ ः ही जात ४३ दिवसात फुलोऱ्यात येते. ९८ ते १०५ दिवसात परिपक्व होते. बियाण्यांचा रंग पांढरा असून तेलाचे प्रमाण ४८ ते ४९ टक्के आहे. उत्पादन ७ ते ८ क्विंटल प्रति हेक्‍टरी मिळते.

 ः डॉ. ई. आर. वैद्य, ७६२०६९९६१९
(अखिल भारतीय तीळ संशोधन योजना, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

News Item ID: 
18-news_story-1550662430
Mobile Device Headline: 
लागवड उन्हाळी तिळाची...
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agricultural stories in Marathi, agrowon,sesamum plantation
Author Type: 
External Author
डॉ. ई. आर. वैद्य
Search Functional Tags: 
मात, mate, खत, Fertiliser, भारत, कृषी विद्यापीठ, Agriculture University
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment