जळगाव : लाल कांद्याची जळगावसह धुळे, साक्री येथील बाजारासह मध्य प्रदेशातील इंदूर व बडवानी येथील बाजारातील आवक कमी होत आहे. यामुळे दरांचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी दर्जेदार कांद्याची पाठवणूक इंदूर, बडवानी येथील बाजारात करीत असल्याची माहिती आहे.
कांदा दर मागील महिन्यात दबावात होते. शहादा (जि. नंदुरबार) तालुक्यातील रायखेड, सुलतानपूर, आडगाव भागातील शेतकऱ्यांसह धुळे जिल्ह्यातील कापडणे, न्याहळोद, लामकानी, नेर भागांतील काही शेतकरी इंदूरच्या बाजाराला पसंती देत आहेत. जळगाव जिल्ह्यातील अडावद, धानोरा (ता. चोपडा), यावल तालुक्यातील डांभुर्णी, किनगाव भागांतील शेतकरीदेखील इंदूरच्या बाजारास पसंती देत आहेत.
कांदा दरात जळगाव, धुळे, साक्री, पिंपळनेर, चाळीसगाव येथील बाजारात सुधारणा झाली. या आठवड्यात प्रतिक्विंटल किमान ३५० व कमाल ८५० रुपये दर मिळाले. जळगावमधील पांढऱ्या कांद्याची आवक जवळपास बंद झाली आहे. दोन ते तीन दिवसच पांढऱ्या कांद्याची आवक जळगाव व चाळीसगाव येथील बाजारात होते. त्याचे कमाल दर ९०० रुपयांपर्यंत आहेत. कांद्याला किमान १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाल्यास हे पीक परवडेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
इंदूर येथे चार-पाच शेतकरी मिळून एका ट्रकमधून १३ ते १५ मेट्रिक टन कांदा नेत आहेत. कारण यात वाहतूक खर्च व इतर खर्च कमी लागतो. शिवाय दर अपेक्षित न मिळाल्यास जोखीमही कमी होते. दर्जेदार कांद्याची तेथे मागील आठवड्यात सुमारे १००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत लिलावात विक्री झाली, अशी माहिती एका शेतकऱ्याने दिली.

0 comments:
Post a Comment