Thursday, March 21, 2019

जळगाव जिल्ह्यात हरभरा खरेदीसंबंधी तयारी पूर्णत्वाकडे

जळगाव ः जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसंबंधीची तयारी पूर्णत्वाकडे असून, नोंदणीला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. ११ केंद्र सुरू करण्यासंबंधी कार्यवाही मार्केटिंग फेडरेशन करीत आहे. 

हेक्‍टरी ९.६० क्विंटल, हरभरा खरेदी केली जाईल. काबुली वगळता देशी, विजय, दिग्विजय, पीकेव्हीटू आदी प्रकारच्या हरभऱ्याची ४६२० रुपये प्रतिक्विंटल या दरात खरेदी केली जाईल. खरेदीसंबंधी पाचोरा, अमळनेर, चाळीसगाव, जामनेर, बोदवड, मुक्‍ताईनगर, रावेर, जळगाव, चोपडा येथे केंद्र सुरू होतील. तसेच पारोळा व यावल येथेही केंद्र मंजूर करण्यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाला सादर केल्याची माहिती मिळाली. 

हरभऱ्याचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. बाजारात ३७०० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर हरभऱ्यास मिळत आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे केंद्र सुरू करण्याची मागणी शासनाकडे शेतकरी सतत करीत होते. १५ मार्चपासून हरभरा शासकीय केंद्रात विक्रीसंबंधी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. नोंदणीला चोपडा, रावेर, मुक्ताईनगर, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव भागांत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा प्रतिसाद यावल, पारोळा भागांतही मिळू शकतो म्हणून या भागातही खरेदी केंद्रासंबंधी कार्यवाही सुरू आहे. 

नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात केंद्र सुरू होऊ शकतात. हरभरा विक्रीसंबंधी शेतकऱ्यांना मोबाईलवर संदेश दिले जातील. हे संदेश मिळाल्यानंतर सात दिवसांत केंद्रात हरभरा विक्री बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. हरभरा खरेदीची अंतिम मुदत अजून जाहीर झालेली नाही. 

News Item ID: 
18-news_story-1553171738
Mobile Device Headline: 
जळगाव जिल्ह्यात हरभरा खरेदीसंबंधी तयारी पूर्णत्वाकडे
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

जळगाव ः जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसंबंधीची तयारी पूर्णत्वाकडे असून, नोंदणीला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. ११ केंद्र सुरू करण्यासंबंधी कार्यवाही मार्केटिंग फेडरेशन करीत आहे. 

हेक्‍टरी ९.६० क्विंटल, हरभरा खरेदी केली जाईल. काबुली वगळता देशी, विजय, दिग्विजय, पीकेव्हीटू आदी प्रकारच्या हरभऱ्याची ४६२० रुपये प्रतिक्विंटल या दरात खरेदी केली जाईल. खरेदीसंबंधी पाचोरा, अमळनेर, चाळीसगाव, जामनेर, बोदवड, मुक्‍ताईनगर, रावेर, जळगाव, चोपडा येथे केंद्र सुरू होतील. तसेच पारोळा व यावल येथेही केंद्र मंजूर करण्यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाला सादर केल्याची माहिती मिळाली. 

हरभऱ्याचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. बाजारात ३७०० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर हरभऱ्यास मिळत आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे केंद्र सुरू करण्याची मागणी शासनाकडे शेतकरी सतत करीत होते. १५ मार्चपासून हरभरा शासकीय केंद्रात विक्रीसंबंधी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. नोंदणीला चोपडा, रावेर, मुक्ताईनगर, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव भागांत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा प्रतिसाद यावल, पारोळा भागांतही मिळू शकतो म्हणून या भागातही खरेदी केंद्रासंबंधी कार्यवाही सुरू आहे. 

नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात केंद्र सुरू होऊ शकतात. हरभरा विक्रीसंबंधी शेतकऱ्यांना मोबाईलवर संदेश दिले जातील. हे संदेश मिळाल्यानंतर सात दिवसांत केंद्रात हरभरा विक्री बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. हरभरा खरेदीची अंतिम मुदत अजून जाहीर झालेली नाही. 

English Headline: 
agriculture news in Marathi, work for gram purchase to be final, Maharashtra
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
जळगाव, चाळीसगाव, प्रशासन, हमीभाव, मुक्ता
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment