Monday, April 8, 2019

कळमणा बाजारात गव्हाची आवक २५०० क्‍विंटलवर

नागपूर ः कळमणा बाजार समितीत गव्हाची वाढती आवक असून, गेल्या आठवड्यात १५०० क्‍विंटलपर्यंत असलेली ही आवक या आठवड्यात २५०० क्‍विंटलपर्यंत पोचली होती. १७०० ते १८२२ रुपये क्‍विंटलने गव्हाचे व्यवहार झाल्याची माहिती बाजार समितीमधील सूत्रांनी दिली. 

बाजारात गव्हाची आवक वाढती आहे. गव्हाचे दर मात्र स्थिर असल्याची स्थिती आहे. १७०० ते १८२२ रुपये या दरम्यान आठवडाभर गव्हाचे दर होते. सरबती गव्हाची आवकदेखील एक हजार क्‍विंटलच्या घरात आहे. २४०० ते २८०० रुपये क्‍विंटल असलेला या गव्हाच्या दरात घसरण अनुभवण्यात आली. २२०० ते २५०० रुपये क्‍विंटलने सरबती गव्हाचे या आठवड्यात व्यवहार झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. तांदळाची आवक जेमतेम ५० क्‍विंटलची असून, दर ४५०० ते ५००० रुपये क्‍विंटलवर स्थिर आहेत. 

लुचई तांदळाची आवक सरासरी १०० क्‍विंटलची असून, २२०० ते २४०० रुपये क्‍विंटलचा दर आहे. बाजारातील हरभऱ्याची आवक वाढीस लागली आहे. येत्या काही दिवसातच रोजची आवक दहा हजार क्‍विंटलचा टप्पा पार करेल, अशी शक्‍यता व्यापाऱ्यांनी वर्तविली. गेल्या आठवड्यात ८ हजार क्‍विंटलची सरासरी आवक होती. या आठवड्यात ती ९८५४ क्‍विंटलवर पोचली. ३७५० ते ४२१६ रुपये क्‍विंटलचा दर हरभऱ्याला होता. या आठवड्यात हरभरा दर ४००० ते ४२३८ रुपये क्‍विंटलवर पोचले. तुरीची आवक स्थिर असली तरी, दरात मोठे चढ-उतार होत असल्याचे चित्र आहे. तुरीची आवक सरासरी १५०० ते २००० क्‍विंटलची आहे. ४६०० ते ५३७० रुपये क्‍विंटल असा तुरीचा गेल्या आठवड्यातील दर होता. या आठवड्यात हे दर ४६०० ते ५१९० रुपये क्‍विंटलवर पोचले. 

सोयाबीनची आवक कधी ३०० तर कधी १००० क्‍विंटलची आहे. ३३५० ते ३६११ रुपये क्‍विंटलने सोयाबीनचे व्यवहार झाले. नागपूर लगतच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा भागातून बटाट्याची आवक बाजारात होत आहे. त्यामुळे बटाट्याची आवक वाढून ती सहा हजार क्‍विंटलवर पोचली आहे. ८०० ते ११०० रुपये क्‍विंटलने बटाट्याचे व्यवहार होत आहेत. लसणाची आवक ३८९८ क्‍विंटलची असून, १००० ते ४००० रुपये क्‍विंटल असा लसणाचे दर होते. बाजारात टोमॅटोचीदेखील नियमित आवक असून, १२० क्‍विंटलची सरासरी आवक आहे. १२०० ते १५०० रुपये असा टोमॅटोचा दर होता. 

३००० ते ३६०० रुपये क्‍विंटलने भेंडीचे व्यवहार होत आहेत. भेंडीची आवक १५० क्‍विंटल सरासरी आहे. कच्च्या पपईचे व्यवहार ८०० ते १००० रुपये क्‍विंटलने होत असून, आवक ५० क्‍विंटलची आहे. कारलीची १५० क्‍विंटलची आवक असून, २८०० ते ३२०० रुपयांवर दर स्थिर आहेत. काकडीचे दरात काहीशी तेजी येत १००० ते १५०० रुपयांवरून हे दर १२०० ते १६०० रुपये क्‍विंटलवर पोचले. काकडीची आवक १३० क्‍विंटलची आहे. पालकाचे दर ६०० ते ८०० रुपये क्‍विंटलचे आहेत. १७० क्‍विंटलची पालकाची आवक असल्याचे सांगण्यात आले. १००० ते १२०० रुपये असा चवळीचा दर असून, आवक १५० क्‍विंटलची आहे. ढेमसाची आवक १३२ क्‍विंटल आणि दर १००० ते १२०० रुपये. टरबूज ४०० ते ६०० रुपये क्‍विंटल तर आवक १३० क्‍विंटल. लिंबू ४००० ते ५००० रुपये क्‍विंटल आणि आवक ५० क्‍विंटलची आहे.

News Item ID: 
18-news_story-1554728413
Mobile Device Headline: 
कळमणा बाजारात गव्हाची आवक २५०० क्‍विंटलवर
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in Marathi, In the market the wheat arrivals are 2500 quintals
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
नागपूर, Nagpur, बाजार समिती, agriculture Market Committee, मध्य प्रदेश, Madhya Pradesh, टोमॅटो, भेंडी, लिंबू
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment