नाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पीक आहे. नाचणीपासून बिस्कीट, लापशी, लाडू, पापड, भाकरी, डोसा, आंबिल, वडी, शेवया असे विविध पदार्थ तयार करू शकतो.
फायदे :
१) कॅल्शियम, लोह, प्रथिने, तंतुमय पदार्थ व इतर खनिजे मुबलक.
२) मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक तंतुमय पदार्थाचे जास्त प्रमाण. पचनास हलकी.
३) कर्बोदके भरपूर प्रमाणात आहेत, स्निग्ध पदार्थ अतिशय कमी असल्यामुळे वजन कमी होण्यास मदत.
४) रक्ताक्षय कमी होण्यास मदत.
५) रोजच्या आहारात समावेश केल्याने उच्च रक्तदाब टाळता येतो. रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी नियंत्रणात येते.
६) कॅल्शियम सर्वात जास्त असल्याने हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त, लेसिथिन आणि मिथीओनाईन या अॅमिनो आम्लामुळे पित्त कमी करणे, यकृतामधील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मदत.
७) मिथीऑनीन हे आम्ल केस व त्वचेचे आरोग्य चांगले ठेवते. लेसिथीन या अमिनो आम्लामुळे पित्त कमी होण्यास मदत. प्रक्रिया पदार्थ ः केक ः
१) नाचणी पीठ २०० ग्रॅम, साखर १०० ग्रॅम, लोणी २०० ग्रॅम, अंडी ४, पाणी, काजू घ्यावेत.
२) नेहमीच्या केक तयार करण्याच्या पद्धतीने बेकिंग ओव्हनमध्ये ठेवावा बेकिंग ओव्हनचे तापमान हे १८० अंश सेल्सिअसला १० ते १५ मिनीट ठेवावे .
२) तयार केक नाचणीच्या नैसर्गिक चॉकलेटी रंगामुळे आकर्षक दिसतो.
बिस्किटे
१)सर्वप्रथम १० ते २० टक्के नाचणी पीठ मैद्यात मिसळून त्यापासून बेकिंग ओव्हनमध्ये बिस्किटे तयार करता येतात. २) नाचणी मिसळल्यामुळे बिस्किटांच्या चवीला व रंगाला काहीही फरक न पडता उलट आकर्षक रंग येतो. सध्या बाजारात नाचणीची बिस्किटे मिळतात.
बेसन डोसे
१) नाचणीचे पीठ २०० ग्रॅम, बेसन ७५ ग्रॅम, आलं-लसूण-मिरची पेस्ट, हळद, कोथिंबीर (बारीक चिरून), ५० ग्रॅम टोमॅटो, २५ ग्रॅम मीठ, इ साहित्य मिसळून घ्यावे.
२) त्यानंतर सर्व साहित्य पाणी घालून एकत्र करावे. डोशाच्या पिठाएवढे पातळ करावे. नॉनस्टिक पॅनवर थोडे तेल टाकून डोसे बनवावेत.
डोसा-उत्तप्पा ः
१) नाचणीचा डोसा बनवण्यासाठी ५० ग्रॅम उडदाची डाळ, १५० ग्रॅम नाचणी पीठ, ५० ग्रॅम तांदळाचे पीठ, १० ग्रॅम मेथी दाणे, एक कांदा (बारीक चिरून), कोथिंबीर, मीठ, २५ ग्रॅम चिरलेला टोमॅटो लागते.
२) सर्वप्रथम डाळ आणि मेथी दाणे रात्री भिजत घालावेत. दुसऱ्या दिवशी दोन्हींमधील पाणी काढून मिक्सरमधून वाटून घ्यावे.
२) डाळ आणि वाटलेली सर्व पिठे, तांदूळ, नाचणी आणि उडदाची वाटलेली डाळ मिसळून डोशाच्या पिठाप्रमाणे रात्री पीठ भिजवून ठेवावे.
३) सकाळी मीठ, कांदा, कोथिंबीर घालून डोसा किंवा उत्तप्पा करावेत.
४) कांदा, कोथिंबीर न घालता प्लेन डोसे नॉनस्टिक तव्यावर करावेत.
पापड
१) बाजारात उपलब्ध असणाऱ्या नेहमीच्या प्रकारातील उडीद पापडांप्रमाणे नाचणीपासून पापड तयार करता येतील.
२) साहित्य ः नाचणी पीठ १ किलो, पापड खार ३० ग्रॅम, १० ग्रॅम हिंग, ७५ ग्रॅम मीठ
३) कृती ः वरील दिलेल्या प्रमाणात साहित्य वापरून नाचणीचे पापड तयार करता येतात.
समाधान पंडित खुपसे ः ८९७५९२२९२१
(लेखक सैम हिगिनबॉटम कृषी, प्रौद्योगिकी एवं विज्ञान विश्वविद्यालय प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत )

0 comments:
Post a Comment