मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २०) झालेल्या लिलावामध्ये देशी वांग्याला तब्बल सहा हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल इतका राज्यात सर्वाधिक दर मिळाला.
या लिलावानंतर फटाके उडवून वांगी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे व शेतकऱ्यांचे बाजार समितीने अभिनंदन केले. या वेळी बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, संचालक सिद्धेश्वर आवताडे, सत्यजित सुरवसे, मोहन कोंडुभैरी, अजीम शेख, पांडुरंग मेटकरी, अडत मालक अविनाश चेळेकर, अनिल बोदाडे आदी उपस्थित होते.
राज्यात मोठ्या बाजार समितीत जाणारी वांग्यांची आवक मंगळवेढा बाजार समितीमध्ये होऊ लागली आहे. येथील बाजार समितीमधून व्यापारी वांगी खरेदी करून थेट मुंबई, चडचण, विजयपूर, जत येथे पाठवत असल्याने वांग्याला चांगला दर मिळत आहे. गुरुवारच्या लिलावामध्ये सत्यवान रामा शिंदे (रा. डोंगरगाव, ता. मंगळवेढा) या शेतकऱ्याने आपली वांगी बाजार समितीमध्ये आणली होती. वसंत रामचंद्र चेळेकर यांच्या अडत दुकानात शिंदे यांच्या मालाचा सौदा झाला. यात शिंदे यांच्या वांग्याला प्रतिक्विंटल सहा हजार ५०० रुपये दर मिळाला. गुरुवारी झालेल्या लिलावाचे राज्यातील दरपत्रक पाहिले असता, मंगळवेढा बाजार समितीचा हा दर सर्वाधिक आहे.

0 comments:
Post a Comment