सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात कांद्याला चांगला उठाव मिळाला. किंचित चढ-उतार वगळता दर 'जैसे थे' राहिले. कांद्याला सर्वाधिक १६०० रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
बाजार समितीच्या आवारात कांद्याची आवकही कमीच होत आहे. रोज जेमतेम २० ते ४० गाड्या आवक झाली. आवक कमी असली, तरी मागणीही चांगली राहिली. त्यामुळे दर काहीसे स्थिर राहिले. कांद्याची सगळी आवक स्थानिक भागासह बाहेरील जिल्ह्यातून राहिली. आवक आणि मागणीतील ही तफावतच दरातील स्थिरता टिकून राहण्यास पूरक ठरते आहे. कांद्याला प्रतिक्विंटल किमान २०० रुपये, सरासरी ९०० रुपये आणि सर्वाधिक १६०० रुपये इतका दर मिळाला.
फळभाज्यांच्या दरातही काहीशी सुधारणा राहिली. त्यातही टोमॅटो, वांग्याला चांगला उठाव मिळाला. त्यांची आवक ही रोज ५० ते २०० क्विंटलपर्यंत राहिली. टोमॅटोला प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये आणि वांग्याला प्रतिक्विंटलला १५०० ते ३५०० रुपये, असा दर राहिला. हिरवी मिरची, ढोबळी मिरचीचे दरही टिकून राहिले. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला २००० ते ४००० रुपये, ढोबळी मिरचीला १८०० ते २२०० रुपये असा दर मिळाला. भाजीपाल्याच्या दरात मात्र चढ-उतार झाला.

0 comments:
Post a Comment