कोल्हापूर - बाजार समितीत कांद्यास दहा किलोस ४० ते १६० रुपये दर मिळाला. कांद्याची दररोज दहा ते अकरा हजार पोती आवक झाली. बटाट्याची आवक चार हजार पोत्यांची होती. बटाट्यास दहा किलोस ८० ते १६० रुपये इतका दर मिळाल्याची माहिती मिळाली.
लसणाची शंभर ते दीडशे पोती आवक होती. लसणास दहा किलोस ३०० ते ९०० रुपये इतका दर होता. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली. अडीच ते तीन हजार क्रेट टोमॅटो बाजार समिती दाखल झाले. त्यास दहा किलोस ५० ते २०० रुपये दर मिळाला.
ओल्या मिरचीची पाचशे ते सहाशे पोती आवक होती. मिरचीस दहा किलोस १०० ते ४०० रुपये दर होता. कारल्याची दोनशे ते तीनशे पाट्या आवक होती. कारल्यास दहा किलोस २०० ते ४५० रुपये इतका दर मिळाला. भेंडीची साडेतीनशे ते चारशे करंड्या आवक होती. भेंडीस दहा किलोस ८० ते ४०० रुपये इतका दर होता.
कोथिंबिरीची १३ ते १४ हजार पेंढ्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा एक हजार ते चार हजार रुपये इतका दर होता. या सप्ताहाच्या तुलनेत कोथिंबिरीच्या आवकेत फारशी वाढ नसल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. मेथी, पालक शेपूस शेकडा ५०० ते ८०० रुपये दर मिळाला.

0 comments:
Post a Comment