नागपूर ः शेतकरी खरीप हंगामात गुंतल्याने तसेच नवा शेतीमालही नसल्याने बाजारातील आवक काहीशी मंदावली आहे. व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारात सोयाबीनची आवक अवघी २०० क्विंटलची आहे. सोयाबीनचे दर ३४५० ते ३६११ रुपये क्विंटल होते. या आठवड्यात हे दर ३७०० ते ४११४ रुपयांवर पोचले.
कळमणा बाजार समितीत सध्या शेतीमालाची आवक जेमतेम आहे. सोयाबीनची गेल्या आठवड्यात १०२ क्विंटलची आवक होती. त्यात काहीशी वाढ होत आवक २०० क्विंटलपर्यंत पोचली. हंगामात ही आवक काही हजाराच्या घरात राहते. बाजारात हरभऱ्याची आवक १४३ ते ३१० क्विंटलची आहे. हरभऱ्याचे दर ३९०० ते ४१६२ रुपये क्विंटलचे आहेत. हरभरा दर गेल्या आठवड्यापासून स्थिर असल्याचे सांगण्यात आले. तुरीची आवकदेखील ५० ते १०० क्विंटलचीच आहे. तुरीचे दर या आठवड्यात ४६०० ते ५७०० रुपये क्विंटलचे होते.
मुगाचे दर ५००० ते ५२०० रुपये क्विंटलचे आहेत. मुगाची आवक अवघी २२ ते २३ क्विंटलची होती. बाजारात बटाटा आवक ४६५६ क्विंटलची असून, दर ९०० ते १२०० रुपये आहेत. गेल्या पंधरवाड्यापासून बटाटा दर स्थिर असल्याची माहिती देण्यात आली. बटाट्याची आवक लगतच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा भागातूनही होत असल्याचे सांगण्यात आले.
पांढऱ्या कांद्याची आवक १७८६ क्विंटलची, तर दर १३०० ते १९०० रुपये आहेत. लसूण दरात सर्वाधिक तेजी अनुभवल्या जात आहे. २२१ क्विंटलची आवक लसणाची या आठवड्यात झाली. ४००० ते ८००० रुपये क्विंटलचा दर होता. आल्याचे दर ४००० ते ८००० रुपये क्विंटलचे, तर आवक ३४२ क्विंटल होती. वाळलेल्या मिरचीच्या दरातही तेजी आली आहे. ७००० ते १०००० रुपये क्विंटलचे, दर तर आवक १३५३ क्विंटलची झाली.

0 comments:
Post a Comment