सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात हिरवी मिरची, ढोबळी मिरची, वांग्याला चांगला उठाव मिळाला. त्यांचे दर या सप्ताहातही पुन्हा टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात हिरव्या मिरचीची रोज ६० ते १०० क्विंटलपर्यंत आवक राहिली. ढोबळी मिरची आणि वांग्याची आवक मात्र एकदमच कमी होती. रोज प्रत्येकी १० ते २० क्विंटलपर्यंत आवक राहिली. ही सगळी आवक स्थानिक भागातूनच झाली. बाहेरील आवक अगदीच कमी होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ५००० रुपये, ढोबळी मिरचीला किमान १८०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक २६०० रुपये, तर वांग्याला किमान १००० रुपये, सरासरी १७०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर मिळाला.
गेल्या महिनाभरापासून हिरव्या मिरचीचे दर तेजीत आहेत. या सप्ताहातही पुन्हा तेजीत राहिले. त्याशिवाय गवार, भेंडी यांनाही मागणी वाढली. त्यांचे दरही टिकून होते. त्यांची आवक मात्र तुलनेने कमी राहिली. रोज प्रत्येकी १० ते १५ क्विंटलपर्यंतच आवक राहिली. गवारीला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी २२०० रुपये आणि सर्वाधिक ४५०० रुपये, तर भेंडीला किमान ८०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये असा दर मिळाला. कांद्याच्या दरात मात्र फारसा चढ-उतार झाला नाही. त्याची आवक कमी झाली, पण दर जैसे थे राहिले. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १६०० रुपये दर मिळाला.
कोथिंबीर वधारलेलीच
भाजीपाल्यामध्ये गेल्या काही दिवसांत कोथिंबिरीचे दर सर्वाधिक तेजीत आहेत. मेथी आणि शेपूलाही बऱ्यापैकी उठाव आहे, पण दर स्थिर आहेत. त्या तुलनेत कोथिंबिरीला उठाव आणि दरही सर्वाधिक मिळाला आहे. बहुधा या हंगामातील कोथिंबिरीचा हा सर्वाधिक दर असेल. कोथिंबिरीची रोज ३ ते ५ हजार पेंढ्यांपर्यंत आवक होती. मेथी आणि शेपूची आवक अवघ्या २ हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी १४०० ते सर्वाधिक २४०० रुपये, मेथीला ९०० ते १३०० रुपये आणि शेपूला १००० ते १४०० रुपये असा दर मिळाला.

0 comments:
Post a Comment