नागपूर ः राज्यात सेंद्रिय शेतीचे दिशाहीन वारे वाहत असताना आणि त्यासंदर्भाने नुसत्या पोकळ बाता होत असतानाच वनामतीने पुढाकार घेत राज्यात सेंद्रिय शेतमाल उत्पादनाचा ब्रँड काढण्याचा निर्णय घेतला आहे. वनामती असेच या ब्रँडचे नाव राहणार असून, त्या-त्या जिल्ह्याचा उल्लेख ब्रँडच्या दर्शनी भागात केला जाणार आहे.
गोंडखेरी येथील विभागीय सेंद्रिय शेती केंद्राने केलेल्या दाव्यानुसार महाराष्ट्र सद्यःस्थितीत सेंद्रिय शेती क्षेत्रात आघाडीचे राज्य आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र कोणत्याही सर्टिफिकेशनशिवाय राज्यात शेतमालाची विक्री सेंद्रियच्या नावाखाली होत असल्याचे चित्र आहे. सेंद्रियच्या नावाखाली होणारी लुबाडणूक येथेच थांबत नाही, तर अशा शेतमालासाठी अव्वाच्या सव्वा दरही ग्राहकांकडून आकारले जातात. या प्रकारावर नियंत्रणासोबतच सेंद्रिय शेतमालाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार, व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेद्वारा केला जाणार आहे.
सेंद्रिय शेतमाल उत्पादक गट तसेच पीजीएस प्रमाणपत्रधारकांशी याकरिता संपर्क साधला जाईल. त्यांच्याकडे उपलब्ध प्रमाणित शेतमालाचे पॅकिंग करून तो वनामती ब्रँडखाली राज्यभरात विकण्याचे प्रस्तावित असल्याचे सूत्रांनी सांगितले. वनामती पुणे, वनामती अहमदनगर, वनामती नागपूर असा उल्लेख पॅकिंगवर राहील. त्या-त्या जिल्ह्याची ओळख त्या उत्पादनाला देण्याचा प्रयत्न याद्वारे होणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले पत्र
वनामतीचे संचालक रवींद्र ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. सेंद्रिय शेतमालाला मागणी वाढावी तसेच पौष्टिक आहार सेवन करता यावा याकरिता सहकार्याचे आवाहन यातून केले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, सैनिक तसेच विद्यार्थी वसतिगृह, कृषी विद्यापीठांचे वसतिगृह, तसेच इतर शासकीय व अशासकीय वसतिगृहांना सेंद्रिय शेतमाल खरेदीची सक्ती किंवा आवाहन करावे. यातून विद्यार्थी, रुग्णांना सकस व पौष्टिक आहार मिळेल, त्यांचे आरोग्य सुधारेल असा उल्लेख आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांशीदेखील वनामती संपर्क साधणार असून, त्यांच्याद्वारे उत्पादित मालाला मार्केट मिळवून देण्याचा प्रयत्न होईल.

0 comments:
Post a Comment