जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक व दर स्थिर आहेत. मुगाला जळगाव व चोपडा (जि. जळगाव) येथील बाजारात प्रतिक्विंटल ५००० ते ६३५० रुपये दर मिळाले. जळगावच्या बाजारात गेल्या आठवड्यात प्रतिदिन सरासरी ७०० क्विंटल आवक झाली. उडदाची कुठेही आवक सुरू झालेली नसल्याची माहिती मिळाली.
जळगाव जिल्ह्यात मुगासाठी चोपडा, मुक्ताईनगर, अमळनेर, जळगाव या बाजार समित्या प्रसिद्ध आहेत. धुळ्यात धुळे, शिरपूर व दोंडाईचा (ता. शिंदखेडा), नंदुरबारात शहादा व नंदुरबार बाजार समितीमध्ये मुगाची आवक होते. चोपडा व अमळनेर येथील बाजारातही आवक सुरू आहे. परंतु, जळगावच्या तुलनेत तेथे यंदा आवक कमी आहे.
गेल्या आठवड्याच्या सुरवातीला जळगावात १००० क्विंटल मुगाची आवक झाली. आवक औरंगाबादमधील सिल्लोड, सोयगाव, जालना व बुलडाणा या भागांतील व्यापाऱ्यांकडून अधिक होत आहे. शेतकऱ्यांकडूनही आवक सुरू आहे. परंतु, ती हवी तशी नाही. अधिक ओलावा असलेल्या मुगाला प्रतिक्विंटल ५००० व दर्जेदार मुगाला ६३५० रुपये प्रतिक्विंटलचा दर जळगावात मिळाला. चोपडा बाजार समितीत प्रतिदिन ४०० क्विंटल आवक झाली. तर अमळनेरातही प्रतिदिन ७०० क्विंटल आवक झाली. अमळनेर येथेही कमाल ६३५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. नंदुरबार व धुळे येथील बाजारातही आवक सुरू आहे. तेथे या आठवड्यात आवक वाढू शकते. कारण, या भागात मूग काढणीत गेल्या सात-आठ दिवसांपासून व्यत्यय येत होता.
सध्या पाऊस थांबल्याने मूग काढणी वेगात सुरू आहे. धुळे येथील बाजारात प्रतिदिन ८०० क्विंटल आवक झाली. तर शिरपूर येथेही प्रतिदिन ८०० क्विंटल आवक झाली. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदामधील मध्य प्रदेशच्या सीमेलगतचे शेतकरी आपला मूग विक्रीसाठी मध्य प्रदेशातील बडवानी येथे पाठवीत आहेत. तेथे कमाल ६६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती मिळाली.
जळगाव जिल्ह्यात यावल, रावेर, जामनेर येथील बाजारात मुगाची फारशी आवक सुरू नसल्याचे सांगण्यात आले. उडदाची मळणी किंवा काढणी अद्याप अनेक भागांत सुरू झालेली नाही. काळ्या कसदार जमिनीत ही काढणी या आठवड्यात सुरू होऊ शकते. अर्थातच कुठेही बाजारात आवक सुरू झालेली नाही. यामुळे उडदाच्या दरांचा कलही अस्पष्ट आहे. स्वच्छ सूर्यप्रकाशीत वातावरण राहिल्यास उडदाचा दर्जाही चांगला असेल आणि मळणीला वेग येईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

0 comments:
Post a Comment