सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारी (ता. ३०) भाजीपाल्याला पुन्हा उठाव मिळाला, त्यातही कोथिंबीर, मेथी, शेपूचे दर वधारलेलेच राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
बाजार समितीच्या आवारात भाज्यांना चांगला उठाव राहिला. भाज्याची सर्व आवक स्थानिक भागातूनच उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, मोहोळ भागातून झाली. भाज्यांची आवक प्रत्येकी १० ते १५ हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. मागणीत सातत्य असल्याने दरात तेजी आहे. बुधवारी पुन्हा त्यामुळे दर काहीसे वधारलेलेच राहिले. कोथिंबिरीला Aशंभर पेंढ्यांसाठी ११०० ते २००० रुपये, मेथीला ९०० ते १२०० रुपये आणि शेपूला ६०० ते ७५० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय चुका आणि पालकाला प्रत्येकी ३०० ते ५०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय फळभाज्यांच्या दरातही काहीशी सुधारणा राहिली, त्यातही टोमॅटो, वांग्याला चांगला उठाव मिळाला. वांग्याच्या दरात सर्वाधिक तेजी राहिली. त्यांची आवकही रोज ५० ते २०० क्विंटलपर्यंत राहिली.
टोमॅटोला प्रतिक्विंटलला किमान ३०० रुपये, सरासरी ११०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये आणि वांग्याला प्रतिक्विंटलला किमान ६०० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये असा दर राहिला. हिरवी मिरची, ढोबळी मिरचीचे दरही टिकून राहिले. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान ४०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १२०० रुपये दर मिळाला. ढोबळी मिरचीला किमान ३०० रुपये, सरासरी ७०० रुपये आणि सर्वाधिक १२०० रुपये असा दर मिळाला. गवार आणि भेंडीलाही मागणी कायम राहिली. बुधवारी गवारची ५ क्विंटल आणि भेंडीची १५ क्विंटल अशी कमीच आवक होती. त्यांची आवक स्थानिक भागातूनच झाली. पण मागणीमुळे दर पुन्हा तेजीत राहिले.
गवारीला प्रतिक्विंटलला किमान १२०० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये आणि भेंडीला किमान ५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर मिळाला. बटाट्यालाही मागणी होती. त्याची आवक ५०० क्विंटलपर्यंत राहिली. बटाट्याला किमान ८०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला.

0 comments:
Post a Comment