जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. २२) आल्याची २८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २८०० ते ५२०० रुपये दर मिळाला. आवक औरंगाबादमधील सोयगावसह स्थानिक भागातून झाली. आवक कमी असून, दरही स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
बाजारात कोबीची १७ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १६०० ते २९०० रुपये मिळाला. गवारीला २४०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. लिंबांची तीन क्विंटल आवक झाली त्यांना प्रतिक्विंटल २५०० ते ३४०० रुपये दर होता. शेवग्याची अडीच क्विंटल आवक झाली. त्याच्या शेंगांना प्रतिक्विंटल १३५० ते २२०० रुपये दर मिळाला.
वांग्यांची ९ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल १८०० ते ३२०० रुपये दर मिळाला. मेथीची चार क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २००० ते ३२०० रुपये दर होता. डाळिंबाची २२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २४०० ते ५२०० रुपये दर मिळाला.
गाजराची ११ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १२०० ते २२०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची १४ क्विंटल आवक झाली. ७०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
बिटची सहा क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल १५०० ते २४०० रुपये दर मिळाला. गवारीची दोन क्विंटल आवक झाली. बटाट्याची ३१० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ८५० ते १३५० रुपये दर होता.
भेंडीची १५ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ११०० ते १८०० रुपये मिळाला. काशीफळाची २१ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ४०० ते ७५० रुपये होता. पालकाची दोन क्विंटल आवक झाली. त्यास दर ११०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. हिरव्या मिरचीची २८ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १००० ते १६०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची १४ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये दर होता.

0 comments:
Post a Comment