कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे बाजार समितीत गुळाच्या आवकेवर विपरीत परिणाम झाला आहे. चार दिवसांपूर्वी दररोज होणारी दहा हजार गूळ रव्यांची आवक मंगळवारी (ता. २२) केवळ तीन हजार गूळ रव्यांवर आली आहे. आणखी दोन ते तीन दिवस सलग पाऊस झाल्यास गुळाची आवक पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
यंदा महापुरामुळे गुऱ्हाळांची अवस्था बिकट झाली. गुऱ्हाळघरांचे माहेरघर असणाऱ्या करवीर तालुक्यातील ८० टक्के गुऱ्हाळे पाण्याखाली गेली. बहुतांशी गुऱ्हाळघरांसाठी ठेवण्यात आलेले जळण (उसाचे वाळलेले चिपाड) खराब झाल्याने गुऱ्हाळ सुरू करायचे म्हणले तरी जळणाचे करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला. महापुरानंतर पंधरा दिवस चांगले ऊन पडल्याने गुऱ्हाळघर मालकांनी जळण वाळविण्यास सुरवात केली. यामुळे दसऱ्याच्या दरम्यान काही प्रमाणात गुऱ्हाळे सुरू झाली. परंतु, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी जोरदार पाऊस होत असल्याने याचा फटका गुऱ्हाळघर मालकांना बसत आहे.
वाळविण्यासाठी पसरवलेले जळण पावसाने भिजत असल्याने गुऱ्हाळघरे सुरू करणे आव्हान बनले आहे. यातच शिवारामध्ये पाणी साचत असल्याने ऊस तोडणी करणेही अशक्य होत असल्याने आठवड्यापूर्वी धीम्या गतीने सुरू असलेली गुऱ्हाळे पुन्हा बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
बाजार समितीत दररोज घटणारी गुळाची आवक चिंताजनक बनत आहे. बाजार समितीचे सचिव मोहन सालपे म्हणाले, की गेल्या चार दिवसांत गुळाच्या आवकेत घट होत आहे. १८ ऑक्टोबरला दहा हजार गूळ रव्यांची आवक होती. त्यानंतर सलग दोन तीन दिवस पाऊस झाला. यामुळे ही आवक आठ हजार, पाच हजारापर्यंत घसरली. मंगळवारी (ता. २२) तर ही आवक तीन हजारांपर्यंत खाली आली. सातत्यपूर्ण पावसामुळे गुळाचीही प्रतही खराब होत असल्याने हा एक दुसरा धोकाही गूळ उत्पादकांपुढे उभा आहे.

0 comments:
Post a Comment