कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी शेतात उभे असते. या दरम्यान झाडाच्या वेगवेगळ्या अवस्थेत वातावरणानुसार अनेक जैविक आणि अजैविक घटकांचा कपाशीच्या उत्पादनावर परिणाम दिसून येतो. त्यामध्ये विविध रोगांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांपासून दहिया किंवा पानांवरील पांढरे तांबडे डाग या रोगाचा कपाशीवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होताना दिसून येतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत दहिया या रोगाचा प्रादुर्भाव केवळ देशी कपाशीवर (शास्त्रीय नाव - गॉसिपिअम अरबोरीयम) दिसायचा. मात्र, अलीकडे काही वर्षांपासून दहिया किंवा पानांवरील तांबडे डाग हा रोग अमेरिकन कपाशीवरही (शा. नाव - गॉसिपिअम हिरसुटम) दिसून येत आहे.
प्रादुर्भावाची मुख्य कारणे
- बी. टी. कपाशीचे संकरित व रोग संवेदनशील वाणांची वाढलेली लागवड.
- हवामानातील बदलाचे परिणाम.
प्रमुख लक्षणे
- हवामानातील अधिक सापेक्ष आर्द्रता व कमी होत जाणारे तापमान रोगासाठी कारणीभूत ठरते. प्रामुख्याने जुन्या पानांवर वातावरणातील तापमान कमी झाले, की पांढऱ्या रंगाची बुरशी वाढते.
- रोगग्रस्त पाने दही शिंपडल्यासारखी दिसतात.
- या रोगाच्या लक्षणामध्ये सुरवातीला पानांवर अनियमित, टोकदार पांढरट असे १-१० मि.मी. आकाराचे चट्टे पानांच्या शिरांभोवती आढळून येतात.
- पांढऱ्या रंगाच्या बुरशीचा साधारणतः पानांच्या खालच्या बाजूस अधिक प्रादुर्भाव होतो.
- रोगाचे प्रमाण अधिक असेल तर पाने पिवळी तसेच तपकिरी रंगाची पडून सुकून गळून पडतात.
नुकसान
कपाशी पिकामध्ये दहिया रोगाच्या प्रादुर्भावाचा फटका उत्पादकतेस बसत आहे. या रोगामुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण ३८ ते ७५ टक्क्यांपर्यंत नोंदवले गेले आहे.
रोगाची कारणे व रोगवाढीस अनुकूल घटक
- कपाशीवर दहिया रोग रॅमुलारिया अरेओला (Ramularia areola) या बुरशीमुळे होतो.
- ही बुरशी उन्हाळ्यात प्रादुर्भावग्रस्त पीक अवशेषामध्ये राहते.
- बारमाही किंवा स्वयंअंकुरित झालेल्या कपाशीच्या झाडांवरही जिवंत राहते.
- प्रादुर्भावग्रस्त काडीकचरा हा दहिया रोगाच्या प्रसाराचा मुख्य स्रोत आहे. वारा, पाऊस आणि सिंचनाचे पाणी हे प्रमुख घटक या रोगाच्या दुय्यम प्रसारास कारणीभूत ठरतात.
एकात्मिक व्यवस्थापन
- स्वयंअंकुरित कपाशीची झाडे शेतातून उपटून टाकावीत. प्रादुर्भावग्रस्त पिकाचे अवशेष जाळून नष्ट करावेत.
- नत्रयुक्त खतांचा अतिवापर टाळावा.
- कपाशीचे वाण व माती परिस्थिती योग्य बघून लागवडीचे अंतर ठेवावे. शिफारशीत वाणाची सघन पद्धतीने लागवड करावी.
- सुरवातीला रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास कार्बेन्डाझीम (५० डब्लूपी) १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- प्रादुर्भाव जास्त असल्यास, फवारणी प्रतिलिटर पाणी
पायरॅक्लोस्ट्रॉबिन (२० टक्के डब्लू.जी.) १ ग्रॅम किंवा
मेटीराम (५५ टक्के) अधिक पायरॅक्लोस्ट्रबिन (५ टक्के डब्लू.जी.) २ ग्रॅम.
: डॉ. शैलेश गावंडे, ९४०१९९३६८५
(केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर)

0 comments:
Post a Comment