नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात मिरचीची आवक ९९४ क्विंटल झाली. मागील सप्ताहाच्या तुलनेत आवक घटली असून परपेठेत मागणी नसल्याने बाजारभाव वधारले नाहीत. मिरचीच्या लवंगी वाणास प्रतिक्विंटल १५०० ते २५०० व ज्वाला वाणास १२०० ते २५०० प्रतिक्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली.
चालू सप्ताहामध्ये उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटल्याचे दिसून आले. आवक ४९८८ क्विंटल झाली. बाजारभाव १००० ते २७०० प्रतिक्विंटल होते. परपेठेत मागणी कमी झाल्याने बाजारभाव घसरण दिसून आली. बटाट्याची आवक ७७७४ क्विंटल झाली. बाजारभाव ८०० ते १५०० प्रतिक्विंटल होते. लसणाची आवक ९५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ८००० ते १६ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आद्रकची आवक ११५ क्विंटल झाली. त्यास ५५०० ते ७००० प्रतिक्विंटल दर मिळाला.
सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी तर काहींची आवाज जास्त झाल्याने बाजारभावसुद्धा कमी जास्त निघाले. वालपापडी घेवड्याची आवक १२ हजार ३०१ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल २००० ते ३००० दर मिळाला तर घेवड्याला २३०० ते ३००० प्रतिक्विंटल दर मिळाला. वाटाण्याची आवक १८६ क्विंटल झाली. त्यास ८००० ते १० हजार प्रतिक्विंटल दर मिळाला.
फळभाज्यांमध्ये टोमॅटोला २०० ते ६००, वांगी २०० ते ५००, फ्लॉवर ६० ते १४० असे प्रती १४ किलोस दर मिळाले. तर कोबी ८५ ते १९० असा प्रती २० किलोस दर मिळाला . ढोबळी मिरची २६० ते ६५० असा प्रती ९ किलोस दर मिळाला. भोपळा १०० ते ३००, कारले १७० ते २८०, गिलके १३० ते ३२५, भेंडी २४० ते ४२० असे प्रती १२ किलोस दर मिळाले तर काकडीला ११० ते २५०, लिंबू ३०० ते ६००, दोडका २०० ते ३५० असे प्रती २० किलोस दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर १००० ते १०१००, मेथी २००० ते ४४००, शेपू ३५० ते १६००, कांदापात २५०० ते ४०००, पालक १२० ते ३४०, पुदिना १५० ते ३०० असे प्रती १०० जुड्यांना दर मिळाले.
फळांमध्ये चालू सप्ताहात केळीची आवक २७५ क्विंटल झाली. बाजारभाव ५०० ते १००० प्रती क्विंटल मिळाला. मोसंबीची आवक ५९३ क्विंटल झाली. तिला ३००० ते ५४०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सफरचंदाची आवक ११६० क्विंटल झाली. त्यास ५००० ते १०००० प्रतिक्विंटल दर मिळाला. नारळाची आवक १२१३ क्विंटल झाली.
त्यास २५०० ते ३३०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सीताफळाची आवक २०७ क्विंटल झाली. त्यास २००० ते ५५०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला.

0 comments:
Post a Comment