सांगली ः सांगली जिल्ह्यासह अन्य भागांत हळदीच्या उत्पादनात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा परिणाम दरावर झाला आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत गेल्या वर्षीच्या हळदीला प्रतिक्विंटल १ हजार ते १ हजार ५०० रुपये दर कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. यंदा महापुरामुळे हळद पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा चांगले दर मिळतील, अशी आशा आहे.
सांगली बाजार समिती ही हळदीसाठी प्रसिध्द आहे. या बाजारात महाराष्ट्रासह देशातून हळद विक्रीसाठी येते. नवी हळद विक्रीस आली तरी सुरवातीला सरासरी ९ हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. बाजार समितीत दररोज २५ ते ३० हजार पोत्यांची आवक होत होती. हळदीला मोठी मागणी असल्याने सुरवातीच्या टप्प्यात हळदीचे दर स्थिर होते. यानंतर हळहळू हळदीची आवक वाढू लागली. त्यानंतर हळदीच्या दर १०० ते २०० रुपयांनी कमी झाले.
गेल्यावर्षी हळदीचे दरात तेजी, मंदी नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले होते. वास्तविक पाहता गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हळद पिकासाठी अनुकूल वातावरण आणि चांगल्या उत्पादनाने दर कमी राहिले. त्याचा आर्थिक फटका हळद उत्पादक शेतकऱ्यांना बसला.
यंदा दराबाबत अनिश्चितता
गेल्यावर्षीची हळद व्यापाऱ्यांनी खरेदी करून ठेवली आहे. त्याची अजून विक्री झालेली नाही. त्यामुळे नवीन हळद आणि शिल्लक असलेली हळद एकाच वेळी बाजारात विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हळदीचे दर वाढतील का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
हळद आवक व दर दृष्टिक्षेपात (प्रतिक्विंटल-रुपये)
स्थानिक हळद
| वर्ष | आवक | सरासरी दर |
| २०१६-१७ | ५१४१८६ | ९४४४ |
| २०१७-१८ | ११३२१५८ | ८७३८ |
| २०१८-१९ | ९३१२७३ | ७५८३ |
परपेठ हळद
| वर्ष | आवक | सरासरी दर |
| २०१६-१७ | ११०९२१ | ७९३४ |
| २०१७-१८ | ३७१४३८ | ६८७९ |
| २०१८-१९ | २१८१९९ | ५६५६ |

0 comments:
Post a Comment