सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबीर, मेथी, शेपूची आवक अगदीच कमी झाली. एकीकडे भाज्यांना मागणी वाढत असताना, दुसरीकडे आवक कमी होत राहिली. त्यामुळे संपूर्ण सप्ताहभर भाज्यांचे दर पुन्हा वधारलेलेच राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात भाज्यांची आवक मोहोळ, मंगळवेढा, बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या स्थानिक भागातून झाली. गेल्या महिनाभरापासून भाज्यांच्या दरातील तेजी कायम आहे. या सप्ताहातही पुन्हा तीच परिस्थिती होती. आवक कमी आणि मागणी जास्त, यामुळे दर वधारलेले राहिले. मेथीची रोज २ ते ४ हजार पेंढ्या, शेपूची एक ते दोन हजार पेंढ्या आणि कोथिंबिरीची ५ ते ८ हजार पेंढ्या अशी आवक राहिली. पण या आवकेच्या तुलनेत दुपटीने भाज्यांना मागणी राहिली.
कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी १००० ते १८०० रुपये, मेथीला ८०० ते १३०० रुपये आणि शेपूला ७०० ते १२०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय चुका आणि पालकालाही मागणी वाढली. त्यांची आवकही अशीच होती. चुक्याला प्रति शंभर पेंढ्यांसाठी २५० ते ५०० रुपये आणि पालकाला २०० ते ४०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय हिरवी मिरची, वांगी, टोमॅटो यांच्या दरात किंचित चढ-उतार वगळता, त्यांचे दरही काहीसे स्थिर होते. त्यात वांगी आणि हिरवी मिरचीची आवक प्रतिदिन २० ते ४० क्विंटल आणि टोमॅटोची आवक रोज ५०० क्विंटलपर्यंत राहिली.
हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलसाठी किमान ५०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १३०० रुपये, वांग्याला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये आणि टोमॅटोला किमान ५०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३२०० रुपये असा दर मिळाला.
कांदा दरातही तेजी
कांद्याच्या आवकेत काहीशी घट झाली. पण मागणी असल्याने त्यांच्या दरात पुन्हा तेजी राहिली. कांद्याची आवक जेमतेम रोज १० ते ३० गाड्यापर्यंत राहिली. कांद्याची आवक स्थानिक भागातून अगदीच नगण्य राहिली. बाहेरील जिल्ह्यातून ती अधिक राहिली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ५५०० रुपयापर्यंत दर मिळाला.

0 comments:
Post a Comment