नागपूर : गेल्या आठवड्यात सुधारलेल्या सोयाबीनच्या दरात या आठवड्यात अल्पशी घसरण नोंदविण्यात आली. ओलाव्याच्या परिणामी कमी दराने सोयाबीनची खरेदी होत असल्याचे सांगण्यात आले. गेल्या आठवड्यात सोयाबीन ३८०० रुपये क्विंटल होते. या आठवड्यात दर ३६०० रुपयांवर पोचले.
मध्य प्रदेशात संततधार पावसाचा सोयाबीनला फटका बसला. मध्य प्रदेश हे सोयाबीनचे हब म्हणून ओळखले जाते. परंतु, पावसामुळे या भागात सोयाबीन उत्पादकता प्रभावित झाली. परिणामी महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादकांना चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. या वर्षीच्या हंगामात सोयाबीनचे दर ४ हजार रुपये क्विंटलपर्यंत जातील, असे सांगितले जाते.
कळमणा बाजार समितीत गेल्या आठवड्यात नव्या सोयाबीनची ४५६१ क्विंटलची आवक होती. दर ३१०० ते ३८०० रुपये क्विंटल होते. या आठवड्यात आवक ४०८६, तर दर २८०० ते ३६६० रुपये क्विंटलवर पोचले.
आर्द्रता अधिक असल्याचे कारण देऊन सोयाबीनची कमी दराने खरेदी होत आहे. बाजारात गव्हाची आवक ३०० क्विंटलची आहे. गव्हाचे दर २००० ते २११६ रुपये क्विंटलचे आहेत. तांदळाचे व्यवहार २६०० ते २८०० रुपये क्विंटलने झाले. त्याची आवक अवघी पाच क्विंटलची होती. बाजारात ३८०० ते ४२७५ रुपये क्विंटलचा दर हरभऱ्याला होता. या आठवड्यात हरभऱ्याचे दर ३८०० ते ४३०० रुपयांवर पोचले. हरभरा आवक ३५६ क्विंटलची आहे.
तुरीची जेमतेम ९ क्विंटलची आवक, तर दर ५००० ते ५३८० रुपये क्विंटलचे होते. भुईमूग शेंगांची आवक ३० ते ४० क्विंटल आणि दर ४००० ते ५००० रुपये क्विंटलवर स्थिर होते. बाजारात केळी ४५० ते ५५० रुपयांवर स्थिर असून, आवक ६० क्विंटल आहे. द्राक्षाची आवक २३ क्विंटल झाली. दर ५००० ते ६००० रुपयांवर स्थिर आहेत. डाळिंबाचे व्यवहार २५०० ते ७००० रुपये क्विंटलने होत असून, आवक १०४२ क्विंटलची होती. बाजारात बटाटा आवक ४५०० क्विंटल, तर दर १२०० ते १४०० रुपयांचे राहिले. लसणाचे दर १३००० ते १७००० रुपये क्विंटलचे होते. लसणाची आवक ३५० क्विंटल इतकी आहे.
संत्रा-मोसंबीची आवक
कळमणा बाजार समितीत संत्रा आवक १०० क्विंटलची आहे. १००० ते ३००० रुपये क्विंटलने संत्र्याचे व्यवहार होत असून, दर स्थिर असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. मोसंबीची आवक ११० क्विंटलची, तर दर ५००० ते ५९०० रुपये क्विंटलचे आहेत.

0 comments:
Post a Comment