Monday, November 18, 2019

नाशिकमध्ये हिरव्या मिरचीला १३०० ते २५०० रुपये

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात हिरव्या मिरचीची आवक ६८१ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १३००ते २५०० रुपयांचा दर मिळाला. मागणी कमी असल्याने बाजारभावात घट झाली. लवंगी मिरचीला १६०० ते २५००, तर ज्वाला मिरचीला १३०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

चालू सप्ताहामध्ये उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटल्याचे दिसून आले. आवक १७४३ क्विंटल झाली. बाजारभाव  १७०० ते ५००० प्रतिक्विंटल होते. आवक कमी झाल्याने बाजारभाव वाढल्याचे दिसून आले. बटाट्याची  ७१८० क्विंटल आवक झाली. बाजारभाव १००० ते १७०० प्रतिक्विंटल होते. लसणाची आवक १५० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७००० ते १७५०० रुपयांचा दर मिळाला. 

आल्याची आवक १४१ क्विंटल झाली. त्यास ५०००ते ६००० प्रतिक्विंटल दर मिळाला. मागील सप्ताहाच्या तुलनेत आवकेत वाढ झाली. दर सर्वसाधरण राहिले. 

सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी, तर काहींची आवाज जास्त झाली. दर सुद्धा कमी जास्त निघाले. वालपापडी घेवड्याची आवक १०८८६ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १७०० ते ३००० दर मिळाला. घेवड्याला १५००  ते ३००० प्रतिक्विंटल दर मिळाला. वाटाण्याची आवक २४ क्विंटल झाली. चालू सप्ताहात ही आवक मोठ्या प्रमाणावर घटली असून दर स्थिर आहेत. त्यास ३००० ते ५००० प्रतिक्विंटल दर मिळाला. 

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला १५० ते ४५०,  वांगी २७० ते ५५०,  फ्लॉवर ८५ ते १९० असे प्रति १४ किलोस दर मिळाले. कोबी १३५ ते २६० असा प्रति २० किलोस दर मिळाला. ढोबळी मिरचीला २९० ते ५५० असा प्रति ९ किलोस दर मिळाला. भोपळा २५०  ते ४५०,  कारले १८५ ते ३५०,  गिलके १८० ते ४१०, भेंडी ३०० ते ४०० असे प्रति १२ किलोस दर मिळाले. काकडीला २०० ते ५००, लिंबांना  ३०० ते ४००, दोडक्याला ३०० ते ५५० असे प्रति २० किलोस दर मिळाले. भुईमुगाची आवक १७७ क्विंटल झाली. त्यास ४०००ते ६००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

फळांमध्ये चालू सप्ताहात केळीची आवक ७७० क्विंटल झाली. दर ५०० ते १००० प्रती क्विंटल मिळाला. मोसंबीची आवक ३२४ क्विंटल झाली. तिला ३००० ते ५५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. डाळिंबांची आवक ८०३४ क्विंटल झाली. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ४२५ ते ३७५० व मृदुला वाणास ५०० ते ९५०० प्रतिक्विंटल दर मिळाला.

News Item ID: 
18-news_story-1574081105
Mobile Device Headline: 
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीला १३०० ते २५०० रुपये
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in marathi, Green pepper in Nashik 1300 to 2500 rupees per quintal
Author Type: 
External Author
Mukund Pingle
Search Functional Tags: 
नाशिक, Nashik, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, मिरची, टोमॅटो, ढोबळी मिरची, capsicum, केळी, Banana, मोसंबी, Sweet lime, डाळिंब
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment