कोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुजरातला गुळाची मागणी मंदावली आहे. याचा परिणाम गूळ उद्योगावर होत आहे. महापुरामुळे उसाचे नुकसान झाल्याने गुळाचा दर्जाही बिघडत आहे. परिणामी, गुळाच्या दरात गेल्या आठवड्यात क्विंटलला तब्बल ५०० रुपयांची घसरण झाली. गेल्या हंगामाच्या तुलनेत येथील बाजार समितीत तब्बल दीड लाख गूळ रव्यांची आवक घटली आहे. महापूर व अतिवृष्टीमुळे यंदा उसाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे यंदा गुळाचे उत्पादन कमी होऊन दर वाढतील, ही अपेक्षा फोल ठरली आहे.
यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त पंचवीस टक्के गुऱ्हाळे सुरू झाली आहेत. परंतु, ऊस खराब असल्याने त्यातून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने उत्पादक हैराण आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस पूर्णपणे थांबल्याने गुऱ्हाळघरांना गती येताना दिसते. पण, खराब ऊस असल्याने दर्जा राखताना कसरती होत आहेत. दर्जावरही परिणाम होत आहे.
गुजरातच्या बाजारात कोल्हापूरच्या गुळाला खास मागणी आहे. पण, यंदा ऊस उत्पादन कमी असल्याने तेथील व्यापाऱ्यांनी सांगलीसह कर्नाटकातूनही गुळाची मागणी नोंदविली. कोल्हापूरपेक्षा या बाजारपेठांत हमाली कमी असल्याने गूळ वाहतूक स्वस्त आहे. व्यापाऱ्यांनी या भागातून गूळ खरेदीला प्राधान्य दिले. याचा परिणाम ही जिल्ह्यातील गुळावर झाला असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. यंदा दररोज १५ हजार गूळ रव्यांची आवक दररोज होत आहे. याच कालावधीत गेल्या वर्षी २५ ते ३० हजार गूळ रव्यापर्यंत आवक होत होती.
येथील व्यापारीही गूळ शीतगृहासाठी पाठविण्यासाठी फारसे इच्छुक नसल्याची स्थिती आहे. यामुळे जादा गूळ खरेदी करून ठेवायचा कोठे, हा प्रश्न आहे. पंधरवड्यापूर्वी गुळाचा दर क्विंटलला ३८०० ते ४५०० रुपये होता. या सप्ताहात तो सरासरी ५०० रुपयांनी घसरून ३३०० ते ४१०० रुपयांवर आला.
कारखाने सुरू झाल्यावर दरवाढीची शक्यता
गुळाला दर नसल्याने शेतकरी गुळाऐवजी कारखान्याला ऊस पाठविण्याची शक्यता आहे. असे झाले आणि बाजार समितीत गुळाची अगदीच चणचण भासू लागली, तर मात्र गुळाचे दर पुन्हा वाढतील, असा अंदाज आहे. पण सध्या तरी गूळ उत्पादकांना तोटाच सहन करावा लागत आहे.

0 comments:
Post a Comment