वाशीम ः पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नसल्याने गावागावात तक्रारी आहेत. असंख्य शेतकरी तलाठी, तहसील कार्यालयात चकरा मारून थकले आहेत. शेतकऱ्यांना लाभ का मिळाला नाही, याची कारणे शोधली असता आधारकार्डाशी संबंधित चुकांमुळे शेतकरी वंचित राहिल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारच्या चुका दुरुस्त करण्यासाठी आता मोहीम स्तरावर पुन्हा एकदा यंत्रणा काम करणार आहेत.
जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वाशीम जिल्ह्यातील एक लाख ४७ हजार १०० एवढ्या शेतकरी कुटुंबांचा डाटा लाभार्थी म्हणून पाठविण्यात आला होता. एकट्या वाशीम जिल्हयात यापैकी ९७ हजार ५७१ लाभार्थ्यांच्या आधार संबंधित माहितीमध्ये अंशत: चुका आढळून आलेल्या आहेत. चुका राहिल्याने लाभार्थ्यांना मदत मिळालेली नाही.
या चुका दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे. आधारकार्डशी संबंधित चुका दुरुस्त न झाल्यास आधार क्रमांकावर आधारित निधी हस्तांतरित करण्यासाठी अडचणी निर्माण होणार आहे. अशा सर्व याद्या येत्या दोन दिवसात प्रत्येक गावात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ज्या लाभार्थींची नावे या यादीत आहे त्या लाभार्थ्यांनी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन आधारकार्ड व बचत खाते, पुस्तकांची छायांकित प्रत कॉमन सर्व्हिस सेंटरच्या केंद्र चालकाकडे देऊन आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी लागणार आहे. सदर कार्यवाही पूर्ण करण्यासाठी वाशीम जिल्ह्यात ५ डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. दरम्यान शेतकरी कुटुंबांनी आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी, असे प्रशासनाने शेतकऱ्यांना दुरुस्ती करण्यासाठी आवाहन केले आहे.
वाशीम जिल्ह्यातील स्थिती
- जिल्ह्यात १४७१०० लाभार्थी
- ९७५७१ शेतकऱ्यांच्या माहितीत त्रुट्या
- गावागावात लावणार याद्या
- ५ डिसेंबरपर्यंत दुरुस्तीसाठी मुदत
- दुरुस्तीनंतर मोकळा होईल मदतीचा मार्ग

0 comments:
Post a Comment