Thursday, November 28, 2019

राज्यात कांदा दोन ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटल

पुणे ः गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरातील तेजी कायम आहे. पण, या सप्ताहात त्यात आणखीनच वाढ झाली आहे. गतसप्ताहात राज्यातील विवध बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठ्याप्रमाणात आवक होते असून सध्या कांद्याला दोन ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत असल्याचे  बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

लासलगाव येथे कांदा प्रतिक्विंटल २००० ते ६६७१ रुपये
नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवार (ता. २७) रोजी उन्हाळ कांद्याची आवक ३८२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान २५०० ते कमाल ६६७१ रुपये असा दर मिळाला, सर्वसाधारण दर ५७०१ रुपये होते. लाल कांद्याची आवक ३२५४ क्विंटल झाली, त्यास २००० ते ६३५६ असा दर मिळाला. तर सर्वसाधारण दर ५०५१ रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 
सोमवारी (ता. २५) उन्हाळ कांद्याची आवक ३४४ क्विंटल झाली. त्यास ३२०० ते ७८९९ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ७०५१ मिळाला. तर लाल कांद्याची आवक २८१० क्विंटल झाली. त्यास २००० ते ६१६२ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ५४०१ मिळाला. शुक्रवारी (ता. २२) उन्हाळ कांद्याची आवक ६२३ क्विंटल झाली. त्यास २३०० ते ७९५० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ७०१२ मिळाला. तर लाल कांद्याची आवक ९१५ क्विंटल झाली. त्यास १८०१ ते ६१७५ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ५४०१ मिळाला.
गुरुवार (ता. २१) रोजी उन्हाळ कांद्याची आवक ५४२ क्विंटल झाली. त्यास २५०१ ते ७००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ६४५१ मिळाला. तर लाल कांद्याची आवक ५२० क्विंटल झाली. त्यास १८०१ ते ६००१ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ५५०० मिळाला. बाजार समितीत गतसप्ताहापासून उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर कमी होत असून, त्यातुलनेत लाल कांद्याची आवक वाढताना दिसून आले. दरातही घट होत असल्याचे चालू सप्ताहात पाहायला मिळाले. दि. २३ व २४ नोव्हेंबर रोजी साप्ताहिक सुटी, तर २६ रोजी अमावास्या असल्याने लिलाव बंद होते. 

सोलापुरात कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक १० हजार रुपये
सोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक बऱ्यापैकी वाढली. पण, मागणी आणि आवकेतील तफावत वाढल्याने प्रतिक्विंटलला सर्वाधिक १० हजार रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 
गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरातील तेजी कायम आहे. पण, या सप्ताहात त्यात आणखीनच वाढली. गतसप्ताहात कांद्याची रोज १०० ते २०० गाड्यांपर्यंत आवक होती. कांद्याची आवक मुख्यतः बाहेरील जिल्ह्यातून झाली. स्थानिक भागातील आवक अगदीच कमी राहिली. पण, मागणी असल्याने दर टिकून राहिले. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ३५०० रुपये आणि सर्वाधिक १० हजार रुपये दर मिळाला. या आधीच्या सप्ताहात हीच आवक रोज ८० ते १०० गाड्यांपर्यंत आवक होती आणि दर किमान २०० रुपये, सरासरी ३८०० रुपये आणि सर्वाधिक ७००० रुपये होता. त्या आधी नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यातही कांद्याचा दर किमान २०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ७५०० रुपयांपर्यंत होता. आवकेचे प्रमाणही प्रतिदिन १०० ते १२५ गाड्या असे होते. एकूणच बाजारात होणारी आवक आणि मिळणारा दर, याच्या तुलनेत खूपच तफावत राहिल्याने दरातील तेजी या सप्ताहात आणखीनच वाढल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

नागपूर बाजारात कांदा १२० रुपये किलो
नागपूर  ः किरकोळ बाजारात कांदा दरात मोठी वाढ नोंदविली गेली आहे. १०० ते १२० रुपये किलोने कांद्याची किरकोळ बाजारात विक्री होत आहे. कळमणा बाजार समितीत गेल्या आठवड्यात पांढऱ्या कांद्याचे दर १३०० ते ४५०० रुपये क्‍विंटलपर्यंत गेले होते लाल कांद्याचे व्यवहार १००० ते ४००० रुपये क्‍विंटलने झाल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. त्यानंतर या आठवड्यात पुन्हा कांदा दरात तेजी अनुभवली गेली आहे. सात नोव्हेंबरला कांदा दर ३००० ते ५५००  रुपये क्‍विंटलपर्यंत वधारले होते. कांदा दरात सातत्याने चढउतार अनुभवले जात आहे. बाजारात कांद्याची आवक देखील अल्पशी असून, ती १००० क्‍विंटलच्या घरात आहे. लाल कांद्याची आवक मात्र तीन हजार क्‍विंटलच्या घरात आहे.

कोल्हापूरला दहा किलोस २०० ते ९०० रुपये दर 
कोल्हापूर  ः येथील बाजार समितीत कांद्याला दहा किलोस २०० ते ९०० रुपये उच्चांकी भाव मिळत आहे. गेल्या पंधरा दिवसांत कांद्याची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. बाजार समितीत नगरसह पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कांदा येतो. परंतु कांद्याचे नुकसान झाल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याची आवक २५ टक्क्यांपर्यंत घटली आहे. पाच ते सहा हजार पोती कांदा बाजार समितीत दाखल होत आहे. ही माहिती कांदा-बटाटा विभागातून देण्यात आली.
राज्यात सर्वत्र कांद्यास चांगला दर मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर कोल्हापुरातही कांद्याचे दर वाढल्याचे सांगण्यात आले. अजून पंधरा दिवस तरी कांद्याचे दर तेजीत राहतील, अशी शक्यता व्यापारी सूत्रांनी व्यक्त केली.

सांगलीत कांद्याला प्रतिक्विंटल  १००० ते ९००० दर 
सांगली  ः येथील विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याची आवक कमी अधिक आहे. गुरुवारी (ता. २८) कांद्याची आवक १ हजार ५४० झाली असून, त्यास प्रतिक्विंटल १००० ते ९००० असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
दुय्यम बाजार आवारात सातारा, नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यांतून कांद्याची आवक होते. बुधवारी (ता. २७) कांद्याची आवक १ हजार ४८३ क्विंटल झाली होती. कांद्यास प्रतिक्विंटल १००० ते ८००० असा दर मिळाला होता. मंगळवारी (ता. २६) कांद्याची आवक २०५० क्विंटल झाली असून, त्यास प्रतिक्विंटल १००० ते ८००० असा दर होता. सोमवारी (ता. २५) कांद्याची आवक २७१० क्विंटल झाली होती. कांद्यास प्रतिक्विंटल १००० ते ८५०० रुपये असा दर होता. शनिवारी (ता. २३) कांद्याची २ हजार २८४ क्विंटल आवक झाली असून, १००० ते १०,०११ प्रतिक्विंटल असा दर होता. कांद्याची आवक कमी अधिक होत असल्याने कांद्याचा दरात चढ-उतार होत आहे.  पुढील सप्ताहात कांद्याची आवक स्थिर राहण्याची शक्यता असून दरात वाढ होईल, असा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे.

परभणीमध्ये कांद्याचे दर प्रतिक्विंटल २००० ते ५०००
परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केट मध्ये कांद्याचे दर प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये होते असे मार्केटमधील सूत्रांनी सांगितले.
येथील मार्केटमध्ये आठवड्यातील प्रत्येक शनिवारी आणि मंगळवारी कांद्याची आवक होत असते. शनिवारी परभणी येथील आठवडे बाजार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होते. परंतु, मंगळवारी मात्र आवक कमी असते. सध्या येथील मार्केटमध्ये सोलापूर, नगर या जिल्ह्यांतून तसेच कर्नाटक राज्यातून कांद्याची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील शनिवारी ६०० ते ७०० क्विंटल आणि मंगळवारी १०० ते ५०० क्विंटल कांद्याची आवक झाली. त्या वेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल सरासरी १००० ते ५००० रुपये होते. शनिवारी (ता. २३) कांद्याची ७०० क्विंटल तर मंगळवारी (ता. २६) कांद्याची १०० क्विंटल झाली होती. त्या वेळी कांद्याचा घाऊक दर प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये होते. गुरुवारी (ता. २८) कांद्याची किरकोळ विक्री प्रतिकिलो ३० ते ६० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी मोहंमद अवैस यांनी सांगितले.

News Item ID: 
18-news_story-1574940215
Mobile Device Headline: 
राज्यात कांदा दोन ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटल
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Farming agricultural Business : Onion in the state is two to ten thousand rupees per quintal
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
पुणे, बाजार समिती, उत्पन्न, सोलापूर, नागपूर, व्यापार, कोल्हापूर, नगर, विभाग, परभणी
Twitter Publish: 
Meta Keyword: 
कांद्याच्या दरातील तेजी कायम
Meta Description: 
पुणे ः गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरातील तेजी कायम आहे. पण, या सप्ताहात त्यात आणखीनच वाढ झाली आहे. गतसप्ताहात राज्यातील विवध बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठ्याप्रमाणात आवक होते असून सध्या कांद्याला दोन ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत असल्याचे  बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

0 comments:

Post a Comment