दौंड, जि. पुणे : दौंड बाजार समितीमध्ये ज्वारीची एकूण ८८ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल किमान २३०० व कमाल ४३०० असा बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात ज्वारीची १०१ क्विंटल आवक होऊन त्यास किमान २४०१ व कमाल ३८०० असा बाजारभाव मिळाला होता.
बाजार समितीचे सभापती दिलीप हंडाळ, उपसभापती उज्ज्वला शेळके व सचिव तात्यासाहेब टुले यांनी बुधवारी (ता. १३) याबाबत माहिती दिली. पाटस (ता. दौंड) उपबाजार श्री नागेश्वर यात्रा उत्सवानिमित्त बंद राहिल्याने आवक होऊ शकली नाही. तालुक्यात भुसार माल आणि पालेभाज्यांची आवक स्थिर असून बाजारभाव तेजीत आहेत. दौंड तालुक्यात लिंबाची १६६ डागांची आवक झाली असून त्यास प्रतिडाग किमान २००; तर कमाल ७०० असा बाजारभाव मिळाला.
भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रतिदहा किलोसाठीचे दर) : टोमॅटो - २५०, वांगी - ५००, दोडका - ५५०, भेंडी - २५०, कारले - ३५०, हिरवी मिरची - २००, गवार - ४००, भोपळा - २००, काकडी - २५०. कोथिंबिरीची ५७८० जुड्यांची आवक होऊन त्यास शेकडा किमान १००० व कमाल ३००० असा भाव मिळाला. मेथीच्या १०३० जुड्यांची आवक झाली असून त्यास शेकडा किमान १००० व कमाल २००० असा दर मिळाला.

0 comments:
Post a Comment