फ्रेंच जैव रसायनतज्ज्ञ पियरे कॅल्लेजा यांनी वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे शोषण करणारे व त्यापासून चालणारे दिवे विकसित केले आहेत. या दिव्यांसाठी विजेची आवश्यकता नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकेक दिवा झाडाच्या २०० पट (सुमारे एक टन प्रति वर्ष) कर्बवायू शोषतो. ही किमया आहे ती छोट्या शेवाळाची.
काचेच्या पात्रांमध्ये ठेवलेले एकपेशीय शेवाळ सूर्यप्रकाशामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया सुरू करते. त्यासाठी वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईड शोषते. ऑक्सिजन वातारणामध्ये सोडते. या प्रक्रियेतून तयार झालेली ऊर्जा जोडलेल्या बॅटरीमध्ये साठवली जाते. रात्रीच्या वेळी या ऊर्जेद्वारे दिवे चालतात. ही सामान्य प्रक्रिया असली तरी या विशिष्ट शेवाळासाठी सूर्यप्रकाशाचीही आवश्यकता नसल्याचे व ते केवळ कार्बनडाय ऑक्साईडवर चालत असल्याचा दावा पिएरे करतात. त्यांच्या मते, ज्या ठिकाणी अजिबात प्रकाश नाही, अशा ठिकाणीही या दिव्यांचा वापर करणे शक्य आहे. जागतिक तापमानवाढीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या कर्बवायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. हे दिवे कर्बशोषणामध्ये एकेका झाडाचे काम करणार आहेत. सध्या वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेमध्येही बचत होणार आहे.
शेवाळाचे दिवे या कल्पनेवर पिएरे कॅल्लेजा यांच्यासोबत त्यांचा फर्मेंटअलग या कंपनीतील संशोधकांचा गट २००९ पासून या तंत्रावर काम करत आहे. त्यांनी दिव्यांचे अनेक प्रारुप तयार केले आहेत. हे शेवाळ सामान्यतः पाण्यामध्ये वाढते. त्यामुळे त्यासाठी पाणी असलेले कक्ष, त्यांच्या वाढीसाठी आवश्यक कर्बवायू आत येण्याची व्यवस्था आणि प्रक्रियेतून निघालेला ऑक्सिजन बाहेर सोडण्याची व्यवस्था तयार करण्यात आली आहे. मात्र, प्रकाश संश्लेषणापासून विद्युत ऊर्जेची निर्मिती कशा प्रकारे होते, याबाबतचे तांत्रिक माहिती कंपनीने जाहिर केलेली नाही. कंपनीच्या बोर्डेक्स (फ्रान्स) येथील मुख्यालयामध्ये पार्किंग क्षेत्रांमध्ये एक प्रारुप उभे केले आहे.
पर्यावरणासाठी फायदे
- कार्बन प्रदूषणाच्या समस्येवर उत्तर मिळू शकते. शेवाळाचा एक दिव एका झाडाच्या तुलनेमध्ये २०० पट अधिक कार्बनडाय ऑक्साईड शोषतो. एक ॲशट्री प्रति वर्ष सुमारे ०.१० टन कर्बवायू शोषते, तर हा दिवा १ टनापर्यंत कर्बवायू शोषतो.
- सागर, तलाव, नद्या यांच्या पाण्यातून शेवाळाची गर्दी कमी होईल. त्याचा फायदा मासे व अन्य जलचरांना होऊ शकतो.
- दिव्यातील शेवाळ मृत झाल्यानंतर त्याच्या बायोमासचा वापर अन्य कामांसाठी करता येईल.
मर्यादा
- काचेच्या पात्रांमध्ये शेवाळाची वाढ केली जाते. दर काही काळानंतर या काचेच्या पात्रांची स्वच्छता करणे आवश्यक ठरते.
- नैसर्गिक पर्यावरणामध्ये वाढणाऱ्या शेवाळाच्या तुलनेमध्ये कृत्रिम वातावरणामध्ये वाढवलेल्या शेवाळांचा कार्यकाल कमी राहू शकतो. कारण या शेवाळांनी तयार केलेल्या ऊर्जेचा वापर दिव्यांसाठी केला जाणार आहे. परिणामी दर काही काळानंतर शेवाळ बदलण्याची आवश्यकता राहणार आहे.
- या शेवाळाची विविध पर्यावरणीय घटकांच्या विविध तीव्रतेसाठी संवेदनशीलता तपासणे आवश्यक आहे.

0 comments:
Post a Comment