सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ५) कोथिंबीर, वांगी, पावटा, फ्लॅावर, दुधी दरात सुधारणा झाली आहे. टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली आहे. कोथिंबिरीची १२०० जुड्यांची आवक झाली. त्यांना प्रतिशेकड्यास २००० ते ३००० असा दर मिळाला. कोथिंबिरीला शेकड्यामागे एक हजार रुपयांची दरवाढ झाली आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
येथील बाजार समितीत बहुतांशी भाज्याच्या दरात कमी-अधिक प्रमाणात वाढ झाली आहे. वांग्याची दहा क्विंटल आवक होऊन प्रतिदहा किलोस ६०० ते ६५० असा दर मिळाला आहे. पावट्याची चार क्विंटल आवक झाली. त्यास दहा किलोस ४०० ते ५०० असा दर मिळाला. वांगी व पावट्यास दहा किलो मागे शंभर रुपयांची दरवाढ झाली. फ्लॅावरची ३० क्विंटल आवक झाली.
त्यास दहा किलोस २०० ते २५० रुपये असा दर मिळाला. दुधीला चार क्विंटलला २५० ते ३०० असा दर मिळाला आहे. फ्लॅावर व दुधीच्या दरात दहा किलोमागे ५० रुपयांची दरवाढ झाली.
दोडक्याची १३ क्विंटल आवक झाली. त्यास दहा किलोस ३०० ते ३५० असा दर मिळाला. हिरव्या मिरचीची १८ क्विंटल आवक झाली. दहा किलो मिरचीस १५० ते २०० असा दर मिळाला. गवारीची १८ क्विंटल आवक झाली. तिला दहा किलोस ३५० ते ४०० रुपये असा दर मिळाला. वॅाल घेवड्याची दोन क्विंटल आवक झाली. त्यास ४०० ते ४५० असा दर मिळाला. कारल्याची आठ क्विंटल आवक झाली. त्यांना दहा किलोस ३५० ते ४०० असा दर मिळाला आहे.
ढोबळ्या मिरचीची तीन क्विंटल आवक झाली. तिला प्रतिदहा किलो ३०० ते ३५० रुपये असा दर मिळाला. भेंडीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिदहा किलोस १५० ते २०० असा दर मिळाला. काकडीची दहा क्विंटल आवक झाली. तिला दहा किलोस १०० ते १५० रुपये असा दर मिळाला. टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली आहे.
टोमॅटोची ६४ क्विंटल आवक झाली. त्यांना दहा किलोस १५० ते २०० असा दर मिळाला. पालेभाज्यांत मेथीची एक हजार जुड्याची आवक झाली. मेथीस प्रतिशेकड्यास १५०० ते २००० असा दर मिळाला, अशी माहिती मिळाली.

0 comments:
Post a Comment