वर्धा जिल्ह्यातील कासारखेडा (ता. आर्वी) येथील योगेश माणिकराव लिचडे यांनी शेती आणि शेतीतील मजुरांची समस्या लक्षात घेऊन घरगुती साधनांच्या साह्याने ‘डवरणी व कल्टिवेटर’ यंत्र तयार केले आहे. अत्यंत कमी खर्चातील या यंत्रामुळे एक लिटर डिझेलमध्ये एक एकर क्षेत्राची डवरणी शक्य होते.
शेतीमध्ये कोणत्याही पिकाच्या उत्पादनामध्ये तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता भासते. आंतरमशागतीद्वारे तणांचे नियंत्रण करावयाचे असल्यास बैलजोडी आवश्यक असते. मात्र, अनेक शेतकऱ्यांकडे बैलजोडी नसते. मजुरांचा दर वाढला असून कमतरता भासत आहे. त्याचप्रमाणे बैलजोडी व मजूर भाड्याने घेऊन तणनियंत्रण करणेही अधिक खर्चिक (८५० रुपये) ठरते. त्याचप्रमाणे वेळेमध्ये तणांचे नियंत्रण न झाल्यास पिकांना दिलेले खत, पाणी तणांद्वारे उचलले जाऊन पिकाला फटका बसतो. पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. परिणामी शेती परवडत नसल्याचे मत शेतकरी व्यक्त करतात.
शेतकऱ्यांच्या या अडचणी लक्षात घेत पिकाच्या दोन ओळींतील तण काढण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील कासारखेडा (ता. आर्वी) येथील योगेश माणिकराव लिचडे यांनी सुरवातीला घरगुती साधनांच्या साह्याने ‘डवरणी व कल्टिवेटर’ यंत्राची निर्मिती केली. या यंत्राला १६ हजार रुपये खर्च आला आहे. एक एकर क्षेत्राच्या डवरणीसाठी केवळ एक लिटर डिझेल लागते. या यंत्रामध्ये पुढील चाक मोठे बसवले असून, यंत्राचा सर्व भार त्या चाकावर येतो. परिणामी चालवण्यासाठी शक्ती कमी लागते, त्याचप्रमाणे यंत्राला नुकसान पोचत नाही. केवळ पास बोथट झाल्यानंतर धार लावावी लागते. एका माणसाद्वारे चालवणे शक्य असून, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हे यंत्र उपयुक्त ठरू शकते. या यंत्राची उपयुक्तता व मागणी लक्षात घेता योगेश यांनी ‘कृषी कन्या पॉवर कल्टिवेटर’ या नावाने उद्योग सुरू केला आहे.
योगेश लिचडे, ८४१२९४४७९९

0 comments:
Post a Comment