सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात टोमॅटो, वांग्याला सर्वाधिक मागणी राहिली. पण, त्यांची आवक तुलनेने कमी राहिली. त्यामुळे त्यांचे दर संपूर्ण सप्ताहभर तेजीत राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात टोमॅटोची आवक प्रतिदिन ५०० ते ८०० क्विंटलपर्यंत राहिली. तर वांग्याची आवक २० ते ५० क्विंटल अशी होती. मागणीच्या तुलनेत त्यांची आवक नसल्याने दरामध्ये चांगलीच तेजी राहिली. टोमॅटो, वांग्याची सर्व आवक स्थानिक भागातून राहिली. टोमॅटोला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, किमान १००० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला.
वांग्याच्या दरामध्ये मात्र उच्चांकी वाढ राहिली. वांग्याला प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ६००० रुपये असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहाच्या तुलनेत त्यांच्या दरात प्रतिक्विंटलमागे २०० ते ५०० रुपयांच्या फरकाने तेजी राहिली. त्याशिवाय गवार, भेंडी आणि घेवड्याच्या दरातील तेजीही पुन्हा कायम राहिली. त्यांची आवकही जेमतेम १० ते २० क्विंटल प्रतिदिन अशी राहिली. त्यामुळे त्यांनाही मागणी वाढली आणि दरही तेजीत राहिले.
गवारला प्रतिक्विंटलला किमान २००० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये, भेंडीला किमान ३०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये आणि घेवड्याला किमान २००० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये असा दर मिळाला.
भाजीपाल्याच्या दरातील तेजीही या सप्ताहात पुन्हा कायम राहिली. भाज्यांची आवक प्रतिदिन प्रत्येकी ८ ते १० हजार पेंढ्यापर्यंत झाली. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये, सर्वाधिक ३५०० रुपये, मेथीला किमान ४०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक १६०० रुपये तर शेपूला किमान ६०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १००० रुपये असा दर मिळाला.
कांद्याच्या दरातील तेजी या सप्ताहातही कायम राहिली. कांद्याची आवक रोज १० ते २० गाड्यापर्यंत झाली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ६००० रुपये असा दर मिळाला.

0 comments:
Post a Comment