भारतातील एकूण मिथेन उत्सर्जनापैकी निम्मे मिथेन वायुचे उत्सर्जन जनावरांतील आंतरिक किण्वनातून होते. मिथेन वायू पर्यावरणासाठी हानिकारक असून, त्यामुळे जनावरांमधील ४ ते १२ टक्के ऊर्जा कमी होते. संतुलित आहाराचा पुरवठा करून जनावरातील मिथेन वायुचे उत्सर्जन कमी करता येते.
कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साइड आणि मिथेन हे वायू हरितगृह वायू म्हणून ओळखले जातात. वातावरणातील हरितगृह वायूंची (जीएचजी) घनता वाढल्यामुळे, जागतिक हवामानातील बदल हा चिंतेचा विषय बनला आहे. या बदलाचा जनावरांच्या उत्पादनावर आणि आरोग्यावर विपरित परिणाम होतो. दुधाळ जनावरांच्या मलमूत्रातून मिथेन हा वायू उत्सर्जित होतो. जनावरांच्या पोटामध्ये (रुमेन) होणाऱ्या आंबवण्याच्या प्रक्रियेतून मिथेन वायूचे उत्सर्जन होते. भारतातील एकूण मिथेन उत्सर्जनापैकी निम्मे मिथेन वायुचे उत्सर्जन जनावरांतील आंतरिक किण्वनातून होते. मिथेन वायू पर्यावरणासाठी हानिकारक असून, त्यामुळे जनावरांमधील ४ ते १२ टक्के ऊर्जा कमी होते.
जनावरांमध्ये उत्पादित होणारे मिथेन वायू ः
जनावरांमध्ये एक विशिष्ट पाचक प्रणाली असते. जनावरांमध्ये रुमेन, रेटिकुलम, ओमासम आणि अबोसम असे पोटाचे चार प्रकार असतात. पोटातील ८० टक्के भाग हा रुमेनने व्यापलेला असतो. यामध्ये जिवाणू, प्रोटोझोआ आणि बुरशीसारखे सूक्ष्मजंतू अस्थिर फॅटिऍसिड्स (व्हीएफए), मायक्रोबियल प्रथिने, कार्बनडाय ऑक्साईड आणि उत्पादनामधील खाद्यपदार्थ तयार करतात. मिथेन व्हीएफएमध्ये एसीटेट आणि बुटायरेट हे मिथनोजेनिक तयार होताना, अतिरिक्त हायड्रोजन तयार होतो. मिथेन उत्पादनासाठी रुमेन मध्ये हवाबंद परिस्थितीत, हायड्रोजन आणि कार्बनडाय ऑक्साईडचा उपयोग मिथेनोजेनिक बॅक्टेरिया आंतरिक मिथेन तयार करण्यासाठी करतात. हे गॅस मुख्यतः जनावरांनी दिलेल्या ढेकरामार्फत बाहेर पडतात.
मिथेन मापनासाठी एसएफ ६ ट्रेसर तंत्रज्ञान
- या तंत्राच्या मदतीने रवंथ करणाऱ्या जनावरांतील मिथेन उत्सर्जनाचे मोजमाप करता येते.
- यांमध्ये एसएफ ६ असलेली एक छोटी निर्जंतूक नळी जनावराच्या रुमेनमध्ये ठेवली जाते.
- जनावरांच्या श्वासोच्छ्वासाचे नमुने सलग चार दिवस कॅनिस्टर या उपकरणामध्ये गोळा केले जातात आणि ते मिथेन आणि एसएफ ६ विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले जातात.
- गॅसक्रोमॅटोग्राफी या उपकरणाद्वारे मिथेन आणि एसएफ ६ ची तिव्रता तपासली जाते.
- श्वासोच्छ्वासाच्या नळीतील उत्सर्जनदर आणि सी एच ४ ते एस एफ ६ हे तिव्रतेचे गुणोत्तर म्हणजेच मिथेन वायुचा उत्सर्जनदर होय.
जनावरातील मिथेन वायुचे उत्सर्जन कमी करण्यासाठी संतुलित आहार
- कमी ॲसिटेट, ब्यूटरायट आणि उच्च प्रोपीओनेट उत्पादनासाठी रवंथ करणारी जनावरे किण्वन पद्धतीस बदलतात. यामुळे उच्च मायक्रोबियल प्रथिने आणि मिथेनचे उत्पादन कमी होते.
- स्तनपान करणाऱ्या जनावरांमध्ये उच्च प्रोपीनेट आणि मायक्रोबियल प्रोटीन संश्लेषण हे दूध उत्पादनासाठी ऊर्जा आणि प्रथिने प्रदान करते.
- राष्ट्रिय दुग्ध विकास प्रकल्प (एन.डी.डी.बी.) ने घेतलेल्या चाचण्यांमधून असे दिसून आले आहे की, संतुलित आहारामध्ये दुधाचे उत्पादन वाढविणे, कार्यक्षमता सुधारणे, सूक्ष्मजीव प्रथिने संश्लेषण आणि प्रति किलो दुधाचे उत्पादन मिथेन उत्सर्जन कमी करण्याची क्षमता आहे.
संतुलित आहाराद्वारे मिथेन वायुचे उत्सर्जन कमी करण्याचे फायदे
- खाद्यामध्ये उपलब्ध स्थानिक खाद्य स्रोतांचा अधिक चांगला उपयोग.
- आहारातील ऊर्जा आणि प्रथिनांचा कार्यक्षम वापर.
- मायक्रोबियल प्रथिने संश्लेषणाची सुधारित कार्यक्षमता.
- एकूण ऊर्जासेवन कमी होणे.
- दुधाळ जनावरांच्या उत्पादन क्षमतेत वाढ.
- दुधाळ जनावरांकडून हरितगृह वायू उत्सर्जन कमी होते.
संपर्क ः योगेश पाटील, ७५८८७६१४४८
(पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, एम. जी. एम. नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधेली, औरंगाबाद)

0 comments:
Post a Comment