- स्थानिक नाव ः नाडुकली, नेडुकली, पापट
- शास्त्रीय नाव ः Pavetta indica L.
- कूळ ः Rubiaceae
- इंग्रजी नाव ः Indian Pavetta, Indian Pellet Shrub
- संस्कृत नाव ः काकचडी
- उपयोगी भाग ः पांढरी फुले
- उपलब्धीचा काळ (फुले) ः मार्च-मे
- झाडाचा प्रकार ः झुडूप
- अभिवृद्धी ः बिया, शाकीय वाढ
- वापर ः फुलांची भाजी
आढळ
- कोकण तसेच पश्चिम घाटातील जंगलात आणि डोंगरकपारीला आढळते.
- कोकणातील जंगलात ओलसर ठिकाणी तसेच नदीकिनारी याचे झुडूप चांगले वाढते.
वनस्पतीची ओळख
- झुडूपवर्गीय वनस्पती असून साधारण २ ते ४ मीटर किंवा त्यापेक्षाही जास्त वाढते.
- साल मऊ, करड्या रंगाची असून तिला अनेक लहान मोठ्या फांद्या असतात. जुन्या फांद्यांच्या सालीच्या खपल्या निघतात.
- पाने साधी, एका आड एक येणारी, गडद हिरव्या रंगाची, लांबट आकाराची असून देठाला आणि टोकाला निमुळती होत गेलेली असतात.
- पाने ६ ते १५ सेंमी लांब व ४ ते ५ सेंमी रुंद, चकाकणारी असून देठ ०.६ ते १.५ सेंमी लांब असतात.
- फुले पांढऱ्या रंगाची, अनेक, सुगंधी, फांदीच्या टोकाशी गुच्छात (५० ते ६० फुले) येतात. एक गुच्छ साधारण ६ ते १० सें.मी. लांब असतो.
- फुलांचे बाह्यदल अतिशय लहान पण दातेरी असून फुलांची नळी साधारण १.५ सें.मी. लांब आणि पाकळीयुक्त असते. फुले सुवासिक असल्यामुळे अनेक फुलपाखरे, मधमाश्या त्यावर घोंघावत असतात.
- फळे लहान हिरव्या रंगाची असून गोल ६ मिमी व्यासाची व झुपक्यात येतात. फळे सुकल्यावर काळी पडतात.
- मार्च ते मेदरम्यान फुले येऊन जून जुलैमध्ये फळे तयार होतात.
औषधी उपयोग
- साल तसेच पाने औषधात वापरतात.
- लहान मुलांच्या पोटातील घाण साफ करण्यासाठी सालीचा काढा किंवा चूर्ण दिला जातो.
- पानांचा काढा मूळव्याधीपासून होणाऱ्या त्रासावर आराम पडण्यासाठी देतात. पानाचा शेक ही आराम पडण्यास मदत करतो.
टीप ः तज्ज्ञांच्या सल्याने औषधोपचार करावेत.
पाककृती
फुलांची भाजी
साहित्य ः
४ ते ५ वाट्या नाडुकलीची फुले, २ बारीक चिरलेले कांदे, १ ते २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ४ ते ५ ठेचलेल्या लसूण पाकळ्या, अर्धा चमचा हळद, १ ते दीड चमचा लाल मिरची पावडर, फोडणीसाठी जिरे, चिमूटभर हिंग, मोहरी, तेल, चवीपुरते मीठ.
कृती ः
प्रथम नाडुकलीची फुले मुख्य दांड्यापासून काढून स्वच्छ धुऊन घ्यावीत. एका पातेल्यात पाणी घालून फुले वाफवून व नंतर पिळून घ्यावी. कढईत तेल गरम करून जिरे मोहरी हिंगाची फोडणी तयार करावी. नंतर तेलामध्ये कांदा व लसूण चांगला परतवून घ्यावा. त्यात हिरव्या मिरच्या, हळद, लाल मिरची पावडर व वाफवलेली फुले टाकून चांगले हलवून घ्यावे. झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवून चवीपुरते मीठ मिसळावे.
- ashwinichothe7@gmail.com,
(क. का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)

0 comments:
Post a Comment