हर्मेटिक तंत्रज्ञान हे धान्य, मसाले आणि हळद साठवणुकीसाठी उपयुक्त आहे. या तंत्रज्ञानात वापरण्यात येणारी बॅग विविध धान्य आणि मसाले पदार्थ साठवणीसाठी उपयुक्त आहे. साठवलेल्या बियाण्यांची उगवण क्षमता टिकून राहते. बॅगेचा वापर ३ ते ४ वर्षांपर्यंत करता येतो.
हर्मेटिक तंत्रज्ञान ही साठवणुकीची पद्धत अन्य साठवण पद्धतींच्या तुलनेने अत्यंत स्वस्त आणि उपयुक्त आहे. या तंत्रज्ञानामध्ये साधारणतः ८० ते ९० किलो क्षमता असलेली, सहज हलवता येणारी पॉलिइथिलीन हवाबंद प्लॅस्टिक बॅग धान्य साठवणीसाठी फायदेशीर आहे. बॅगेची जाडी ८० मायक्रॉन असते.
बॅगेची वैशिष्ट्ये ः
१) कोणत्याही रसायनाच्या वापराशिवाय किमान एक वर्षापर्यंत धान्य किंवा हळदीचे बेणे साठवता येते.
२) बॅग हवाबंद असल्यामुळे त्यामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. बॅगेत कार्बन डाय-ऑक्साईडचे प्रमाण वाढत जाते. यामुळे साठवण केलेले धान्य किंवा हळदीमध्ये कोणत्याही कीटकांची वाढ होत नाही.
३) ही बॅग विविध धान्य आणि मसाले पदार्थ साठवणीसाठी वापरता येते.
४) साठवलेल्या बियाण्यांची उगवण क्षमता टिकून राहते.
५) बॅग हाताळण्यासाठी अत्यंत सोपी आणि सोईस्कर आहे.
६) बॅगेचा वापर ३ ते ४ वर्षांपर्यंत करता येतो. जुन्या बॅगचा वापर आपण घरगुती कामासाठी करू शकतो. उदा. बॅगेच्या धाग्यापासून दोर, चटई बनविता येते.
७) हळदीमधील आर्द्रतेचे प्रमाण योग्य राखले जाते. यामुळे हळदीची गुणवत्ता, रंग आणि कुरकुमीनचे प्रमाण टिकून राहते.
८) हळदीला कीड न लागता, साठवणुकीत एक ते दीड वर्षापर्यंत उत्तम राहू शकते.
९) हे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान धान्य, मसाले आणि हळद साठवणुकीसाठी उपयुक्त आहे.
इमेल ः nileshwariyeole१२३@gmail.com
(पीएच.डी. सहसंशोधिका, सिफेट, लुधियाना, पंजाब)

0 comments:
Post a Comment