नागपूर : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने संत्र्याच्या चीनमधील निर्यातीची शक्यता बळावली आहे. परंतु, नागपुरी संत्रा चीनच्या प्रोटोकॉल लिस्टमध्येच नसल्याने त्याकरिता चीन सरकारशी वाटाघाटी कराव्या लागणार आहेत. त्यानंतरच संत्र्याचा चीनमधील निर्यातीचा मार्ग सुकर होईल, असे जाणकार सांगतात.
अपुरा पाऊस, खालावलेली पाणीपातळी यामुळे गेल्या हंगामात संत्रा बागा जळल्या. त्यानंतर या वर्षी संततधार पावसामुळे संत्र्याची गळ झाली. यामुळे आंबिया बहरातील ४५ टक्के संत्र्याचे नुकसान झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविली आहे. गुरुवारी (ता. १४) विदर्भातील नुकसान पाहणी दौऱ्यावर आलेल्या माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. १५) संत्रा या विषयावर विशेष बैठक घेतली.
या बैठकीला महाऑरेंचे कार्यकारी अध्यक्ष श्रीधर ठाकरे, मनोज जवंजाळ, प्रवीण बेलखेडे, माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, आमदार अनिल देशमुख, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख, जैविक शेती मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे यांच्यासह संत्रा बागायतदारांची उपस्थिती होती.
संत्र्याचे निर्यातक्षम वाण नसल्याची खंत त्यासोबतच नागपुरी संत्र्याच्या निर्यातीसाठी पूरक प्रयत्न होत नसल्याची खंत या वेळी संत्रा उत्पादकांनी शरद पवार यांच्यासमोर व्यक्त केली. त्याची दखल घेत चीनमधील भारतीय वाणिज्य प्रतिनिधी प्रशांत लोखंडे यांच्याशी संपर्क साधत त्यांना भारतीय संत्र्याच्या निर्यातीसाठी प्रयत्न करण्याचे शरद पवार यांनी सांगितले होते.
या बैठकीला आठवडा लोटला आहे. यादरम्यान चीनमधील भारतीय वाणिज्य प्रतिनिधी प्रशांत लोखंडे यांनी महाऑरेंजचे श्रीधर ठाकरे यांच्याशी संपर्क साधत त्यांच्याकडून संत्रा उत्पादन व इतर तांत्रिकक बाबींची माहिती घेतली. सध्या नागपुरी संत्रा निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या चीनच्या प्रोटोकॉल लिस्टमध्ये नाही. केंद्रीय वाणिज्य तसेच कृषी मंत्रालयाने चीन सरकारसोबत वाटाघाटी करीत संत्र्याचा समावेश प्रोटोकॉल लिस्टमध्ये केला तरच संत्रा निर्यातीला चालना मिळणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात संत्र्याचा प्रोटोकॉल लिस्टमध्ये समावेशाचे मोठे आवाहन आहे.

0 comments:
Post a Comment