सांगली : दिवाळीच्या महिन्याच्या सुटीनंतर बाजार समितीमध्ये बेदाणा सौद्यांना प्रारंभ झाला. या सौद्यात २१५ रुपये प्रतिकिलो असा उच्चांकी भाव मिळाला. ५० गाड्यांतून पाचशे टन बेदाणा आवक झाली होती. सरासरी दर २० रुपयांनी वाढला असल्याचे दिसून आले.
दिवाळीच्या सुटीमध्ये बेदाणा सौदे बंद होते. सुटीनंतर मुहूर्तावर हळद व गुळाच्या सौद्यांना नुकताच प्रारंभ झाला होता. त्यामुळे दिवाळी सुटीनंतरच्या सांगलीतील सौद्यामध्ये बेदाण्याला किती दर मिळतो? याकडे शेतकरी, व्यापारी वर्गाचे लक्ष लागले होते. बुधवारी (ता. २०) बेदाणा सौद्यात तब्बल पाचशे टनांची आवक झाली होती. दुपारी सौद्यांना प्रारंभ झाला. त्यानंतर सायंकाळी सहापर्यंत सौदे चालू होते.
प्रशांत मजलेकर यांच्या दुकानातील श्री. पद्मन या शेतकऱ्यांच्या ५० बॉक्सच्या बेदाण्याला प्रतिकिलो २१५ रुपये इतका उच्चांकी भाव मिळाला. नंदी कृष्णा ट्रेडर्सचे अमित पटेल यांनी तो खरेदी केला.
चांगल्या प्रतिच्या हिरव्या बेदाण्यास १६० ते २१० रुपये तर मध्यम प्रतिच्या हिरव्या बेदाण्यास १२० ते १६० रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. काळा बेदाण्याचा दर वाढला असून ७० ते १०० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. पहिल्याच बेदाणा सौद्यात सरासरी २० ते २५ रुपये प्रतिकिलो दर वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
सौद्यासाठी व्यापारी मनोज मालू, नितीन अटल, नितीन मर्दा, पणू सारडा, अस्की सावकार, गगन अग्रवाल, रुपेश पारेख, विनायक हिंगमिरे, मुकेश केसरी, वृषभ शेडबाळे, विनोद कबाडे, जितू शेटे, हिरेन पटेल, अजित मगदूम, तुषार शहा, नीलेश मालू बाजार समितीचे प्रभारी सचिव आर. ए. पाटील, के. एन. दरुरे, प्रशांत कदम आदींसह शेतकरी उपस्थित होते.

0 comments:
Post a Comment