पुणे ः पावसामुळे बटाट्याचे आगार असलेल्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड या तालुक्यांतील उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे. परिणामी बाजारपेठेतील स्थानिक नवीन बटाट्याची आवक ५० टक्क्यांपर्यंत घटली आहे. यामुळे बटाट्याची बाजारपेठ ही आग्रा आणि इंदौर येथील आवकेवर अवलंबून असून, आवकेअभावी स्थानिक बटाट्याचे दर वाढले असल्याची माहिती पुणे बाजार समितीमधील बटाट्याचे प्रमुख अडतदार राजेंद्र कोरपे यांनी दिली.
श्री. कोरपे म्हणाले, की पुणे बाजार समितीमध्ये बटाट्याची आवक ही प्रामुख्याने आग्रा, इंदौर आणि स्थानिक भागातून होत असते. सध्या बाजारात आग्रा, इंदौर येथील शीतगृहातील बटाट्याची आवक सुरू आहे. शीतगृहातील साठा संपत आला असून, फार कमी साठा असलेली शीतगृहे चालविणे शक्य नसल्याने शीतगृह चालकांनी तातडीने बटाटा बाजारपेठेमध्ये पाठवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे बाजार समितीमधील आवक वाढली आहे.
स्थानिक आवकेमध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड आणि काही प्रमाणात जुन्नर तालुक्यातून बटाट्याची आवक होत आहे. यामध्ये आंबेगाव तालुक्यातील बटाट्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र अतिवृष्टीमुळे बटाट्याची काढणी लांबली. परिणामी बटाटा शेतातच सडण्याचे आणि भिजण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांचे ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले. त्यातच जास्त काळ बटाटा भिजल्याने दर्जा घसरला आहे. यामुळे चांगल्या बटाट्याला चांगले दर मिळत आहेत. पुणे जिल्ह्यातून या हंगामात साधारण दररोज १०० टनांची आवक होत असते. मात्र सध्या केवळ ३० ते ४० टन आवक होत असून, १२ ते १६ रुपये किलो असे दर मिळत आहे. सध्या इंदौर येथून सुमारे १०० टन; तर आग्रा येथून १ हजार टन बटाटा आवक होत असून, अनुक्रमे दर १७ ते २० आणि १० ते १५ रुपये प्रतिकिलो आहेत.

0 comments:
Post a Comment