द्राक्ष विभागामध्ये सध्या पाऊस संपल्याची स्थिती असून, त्यानंतरही काही ठिकाणी नवीन वाढ जास्त प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी वाढ थांबवलेली दिसून येते. जमिनीचा प्रकार व पावसाचे प्रमाण यानुसार द्राक्ष वेलीमध्ये पिवळी पडलेली निस्तेज कॅनोपीबरोबरच वेलीचा वाढलेला जोम दिसून येईल. या स्थितीमध्ये मुळांचा विकास अत्यंत महत्त्वाचा असून, पुढीलप्रमाणे उपाययोजना महत्त्वाच्या ठरतील.
पिवळी व निस्तेज कॅनॉपी ः
ज्या बागेत बोदामध्ये पाणी जास्त प्रमाणामध्ये जास्त काळासाठी साठून राहिले असेल, अशा बागांमध्ये मुळांनी काम करणे बंद केले आहे. परिणामी, जमिनीमध्ये उपलब्ध असलेली अन्नद्रव्येही वेलीस घेता आली नाहीत. विविध अन्नद्रव्यांच्या कमतरता वेलीमध्ये दिसून येत आहेत. अन्नद्रव्यांचा पुरवठा पूर्णपणे झाला नसल्याच्या स्थितीमध्ये पाने अशक्त, पातळ व कमकुवत राहतील. दुसऱ्या परिस्थितीतील बागेमधील पाण्यासोबत मुळांच्या कक्षेतून अन्नद्रव्यांचा निचरा झाला आहे. त्याचाही एकंदरीत विपरीत परिणाम वेलीच्या अन्नद्रव्य पुरवठ्यावर झाल्याचे दिसत आहे.
आता पाऊस संपल्यावर बोद वाफसा स्थितीत आल्यानंतर जमिनीतून अन्नद्रव्ये देणे गरजेचे आहे. ज्या बागेत काळी भारी जमीन आहे, अशा ठिकाणी वाफसा येण्यास उशीर लागू शकतो. मात्र, हलक्या जमिनीत बोद खोदता येईल. पाण्याचा निचरा बोदामधून पूर्ण झालेल्या परिस्थितीत ठिबकद्वारे जमिनीतून अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे गरजेचे आहे. बऱ्याच ठिकाणी पाने पिवळी पडली असली तरी ती नेमकी कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिवळी पडली आहेत हे समजणे कठीण होते. सामान्यपणे प्रीब्लूम ते मनी सेटिंगच्या अवस्थेतील बागेत फेरस, मॅग्नेशिअम झिंक इ. महत्त्वाच्या अन्नद्रव्याची कमतरता पानांमध्ये दिसून येईल. नत्र, फेरस, मॅग्नेशिअम व झिंक इ. अन्नद्रव्याची पूर्तता करावी.
मुळीचा विकास महत्त्वाचा ः
द्राक्षबागेत सततच्या व अधिक पावसामुळे मुळांचे कार्य करण्याची क्षमता कमी झाली आहे. काही बागेमध्ये कार्य करणारी मुळे काळी पडल्याचे दिसून येते. म्हणजेच या वेळी घडाच्या विकासात आवश्यक असलेली पांढरी मुळे तयार झालेली नाहीच. यामुळे पुढील काळात घडाच्या विकासात अडचणी येतील. तेव्हा वाफसा आलेल्या परिस्थितीत बागेत गरजेनुसार ठिबकच्या खालील जागा मोकळी करावी किंवा शक्य झाल्यास बोदाच्या बाजूने अवजारांच्या साह्याने माती मोकळी करावी. यामुळे काही प्रमाणात मुळे तुटून, नवीन पांढऱ्या मुळ्या येण्याची प्रक्रिया सुरू होईल. या नव्या मुळ्या तयार झाल्यानंतरच घडाच्या विकासात मदत होऊ शकेल.
या वर्षी अधिक काळ व अधिक पावसाच्या स्थितीमुळे थंडीसुद्धा जास्त पडण्याची शक्यता आहे. या थंडीचा कालावधीसुद्धा पुढे वाढू शकेल. थंडीच्या परिस्थितीत बागेत घडाचा विकास कमी प्रमाणात होतो. या वेळी बागायतदारांसमोर संजीवकाचा वापर करून मण्याचा साइज वाढवण्याचाच पर्याय शिल्लक राहतो. तरीही वाढलेल्या थंडीमुळे बागेतील किमान तापमान फारच कमी राहिल्यास मण्याच्या विकासात अडचणी येतात. अशावेळी बागेत बोदामधील मुळी जास्तीत जास्त चांगली ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. मुळांच्या कक्षेतील तापमान वाढवण्याच्या दृष्टीने बोदावर आच्छादन (मल्चिंग) हा एक महत्त्वाचा पर्याय असू शकतो.
वेलीचा वाढीचा जोम ः
बऱ्याच बागेमध्ये वाफसा परिस्थितीनंतर नवीन फुटींचा जोम जास्त प्रमाणात दिसून येईल. यामुळे बागेत बगलफुटीसुद्धा जास्त प्रमाणात निघतील. वाढीचा हा जोम कमी करणे गरजेचे आहे. खरे तर, वातावरणात या वेळी आर्द्रता जास्त प्रमाणात असल्यामुळे वाढीकरिता पोषक असे वातावरण तयार झालेले आहे. वेलीचा हा जोम कमी करण्याकरिता सध्या पालाशची फवारणी व जमिनीतून उपलब्धता हा एक महत्त्वाचा पर्याय या वेळी आहे. पाण्यावर नियंत्रण ठेवणे, शेंडापिंचिंग करणे व बगलफुटी काढून टाकणे अशा गोष्टी या वेळी वाढनियंत्रणास मदत करतील.
सध्या बागेमध्ये दव व धुके या दोन्ही गोष्टींचा त्रास होताना दिसत आहे. पानांवर जितका जास्त वेळ दवबिंदू राहील तितके वेलीवर उपलब्ध रोगाच्या जिवाणूच्या प्रसारास पोषक वातावरण असेल. याकरिताच मोकळी कॅनॉपी असल्यास फवारणीसुद्धा सहजरित्या करता येईल. तसेच कव्हरेजही चांगले मिळेल. पाण्यावर जास्त काळ पाणी असलेल्या परिस्थितीत शिफारशीत बुरशीनाशकांची धुरळणी जास्त फायद्याची ठरू शकेल.
डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०- २६९५६०६०
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

0 comments:
Post a Comment