मागील तीन ते चार आठवड्यांतील पावसामुळे केळी पिकाचे खूप नुकसान झाले आहे. हे पीक २४ ते ४८ तासापर्यंत बागेत साचलेले पाणी सहन करू शकते. मात्र त्यापुढील काळात मुळांना ऑक्सिजन न मिळाल्यास ती कुजायला लागतात. याचा परिणाम पानांवर होऊन ती पिवळी पडतात. अशा परिस्थितीमध्ये बागेतून पाण्याचा निचरा लवकर करणे आवश्यक आहे. पाण्याचा निचरा केल्यानंतर कार्बेन्डाझिम २ मिलि किंवा प्रोपीकोनॅझोल २ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून या द्रावणाची झाडाच्या बुडालगत आळवणी करावी. झाडांची मुळे अन्नद्रव्य शोषून घेण्यासाठी सक्षम होईपर्यंत झाडांवर १९:१९:१९ या खताची (२० ग्रॅम प्रति १५ लिटर पाणी) फवारणी करावी.
बागेचे व्यवस्थापन ः
- मुख्य खोडालगत येणारी पिले धारदार विळीने जमिनीलगत दर २ ते ३ आठवड्यांनी कापावीत.
- बागेतील विषाणूग्रस्त झाडे समूळ उपटून नष्ट करावीत.
- जुन्या कांदेबागेमधील फळवाढीच्या अवस्थेतील घड हे कोरड्या केळी पानांनी किंवा पांढऱ्या पॉलिप्रॉपीलीन कापडाच्या पिशवीने झाकावीत.
- तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास पहाटे बागेत ओला काडीकचरा जाळून धूर करावा.
रोग नियंत्रण ः
१) इर्विनिया रॉट ः
हा जीवाणूजन्य रोग आहे.
नियंत्रण ः
१०० लिटर पाण्यामध्ये ३०० ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराइड अधिक १५ ग्रॅम स्ट्रेप्टोमायसीन अधिक ३०० मिलि क्लोरपायरीफॉस द्रावण तयार करावे. प्रति झाड २०० मिलि द्रावणाची आळवणी करावी.
२) करपा ः
- बागेतील रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत.
- ५ मिलि प्रॉपिकोनॅझोल अधिक १०० मिलि मिनरल ऑइल प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- (टीप ः बुरशीनाशकांच्या शिफारशींना लेबल क्लेम आहे.)
खत व्यवस्थापन ः
मृगबाग ः
- लागवडीनंतर १६५ दिवसांनी प्रतिझाड ८२ ग्रॅम युरिया व ८३ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.
- लागवडीनंतर २१० दिवसांनी प्रतिझाड ३६ ग्रॅम युरिया द्यावा.
नवीन कांदेबाग ः
- पहिला हप्ता लागवडीनंतर ३० दिवसांच्या आत द्यावा (प्रतिझाड ८२ ग्रॅम युरिया व ८३ ग्रॅम म्युरेट ऑफ पॉटेश).
- दुसरा हप्ता लागवडीनंतर ७५ दिवसांनी द्यावा (प्रतिझाड ८२ ग्रॅम युरिया).
ठिबक सिंचनाद्वारे खत देताना ः
नवीन कांदे बाग ः
प्रति हजार झाडासाठी लागवडीपासून १ ते १६ आठवड्यांपर्यंत ४.५ किलो युरिया, ६.५ किलो मोनोअमोनियम फॉस्फेट व ३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.
मृग बाग ः
लागवडीपासून १७ ते २८ आठवड्यांपर्यंत १३ किलो युरिया व ८.५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.
निंबोळी ढेप ः
- नवीन कांदेबागेस प्रतिझाड २०० ग्रॅम
- मृग बागेस प्रति झाड ५०० ग्रॅम
संपर्क ः प्रा. एन. बी. शेख, ०२५७- २२५०९८६
(केळी संशोधन केंद्र, जळगाव)

0 comments:
Post a Comment