Monday, January 13, 2020

द्राक्ष हंगामाची भिस्त फेब्रुवारीवरच

या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला द्राक्षाचा अवघा एक कंटेनर भारतातून युरोपकडे रवाना झाला. मागील वर्षी १ जानेवारीपर्यंत ५१ कंटेनर द्राक्षांची युरोपला निर्यात झाली होती. यावर्षी ९ जानेवारीला ६ कंटेनरमधून एकूण ८३.१३ टन द्राक्ष युरोपच्या दिशेने रवाना झाले. १० जानेवारीला एकाच दिवसाच्या अंतराने कंटेनरचा आकडा ६ वरून १८ पर्यंत वाढला. १० जानेवारीपर्यंत एकूण २४६.१० टन माल युरोपकडे पाठविण्यात आला. हे चित्र द्राक्ष निर्यातीची गती वाढत असल्याचेच निदर्शक आहे.

मागील वर्षी १० जानेवारीला ९८२.१४ टन माल युरोपात निर्यात झाला होता. त्या तुलनेत यंदा अजून बराचसा पल्ला गाठायचा आहे. तरीही वाढीचा वेग पाहता येत्या फेब्रुवारीमध्ये मागील वर्षीची गती साधली जाईल असे दिसते.

द्राक्ष निर्यातदार राजाराम सांगळे म्हणाले, ‘‘जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही पुरेशा प्रमाणात निर्यातक्षम द्राक्ष उपलब्ध होत नसल्याने निर्यातीची गती मंद आहे. पुढील आठवड्यापासून मात्र यात वाढ होत जाणार आहे. फेब्रुवारीमध्येच हंगामाला खरी गती मिळणार आहे.'

यंदाही अडथळ्यांची शर्यत
एकंदर फेब्रुवारीमध्ये मार्केटचे चित्र चांगले राहील असे संकेत मिळत असले तरी द्राक्ष हंगामाची सुरुवात मात्र अडथळ्यांतूनच झाली आहे. हिवाळा असला तरी ढगाळ वातावरण आहे. या स्थितीत  हवामानातील चढ-उतार सुरूच आहेत. अर्लीच्या टप्प्यातील ५५ टक्के बागांचे पावसाने नुकसान झाले. यातील जो माल वाचला त्यातील बहुतांश मालाचे मणी तडकले होते. या शिवाय काही भागात पाकोळी या किडीचा प्रादुर्भाव झाला होता. अशा प्रकारे बराचसा साधारण दर्जाचा द्राक्ष माल बाजारात पाठविला गेल्याने त्याचाही बाजारावर परिणाम झाला.

आंदोलनाचा बसला फटका
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशाच्या अनेक भागात तीव्र आंदोलने झाली. काही ठिकाणी हिंसाचारही भडकला. पश्चिम बंगालमधील आंदोलनाने हिंस्त्र वळण घेतले. बरेच दिवस तणावाची स्थिती असल्याने त्याचा फटका भारतीय द्राक्षांना बसला. पश्चिम बंगालमधून बांगलादेशात जाणाऱ्या मालाच्या मार्गात अनेक अडथळे उभे राहिले. या सगळ्या गोष्टींचा साहजिकच दरावर परिणाम झाला. ८ जानेवारीनंतर स्थिती निवळली आहे. बांगलादेशातील व्यापारी द्राक्ष व्यापारासाठी सरसावले आहेत.

दरम्यान, जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात द्राक्ष शिवारात थंडीचा माहोल तर राहणारच आहे. या स्थितीत जानेवारी अखेरपर्यंत द्राक्षाचे सध्याचे दर स्थिर राहतील अशी स्थिती आहे. यासंदर्भात प्रयोगशील द्राक्ष उत्पादक मनोज जाधव म्हणाले, ‘‘लगतच्या बांगलादेशातील खरेदीदारांकडून भारतातील जम्बो, नानासाहेब पर्पल या काळ्या वाणांसोबत सोनाका या लांब आकाराच्या वाणाला जास्त मागणी असते. मागील वर्षी या काळात काळ्या वाणांना सरासरी प्रति किलो १०० रुपये दर मिळाला होता.’’

या वर्षी वर उल्लेख केलेल्या अडथळ्यांमुळे दर ४५ रुपयांपर्यंत उतरले. बांगलादेशातील खरेदीदार व्यापारीही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर शिवारात दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून येत्या काळात मागणी वाढून शिवारसौद्यांचे प्रमाण वाढत जाणार आहे. पंधरवड्यानंतर दर वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

गत सप्ताहातील द्राक्षांचे देशांतर्गत बाजारातील दर 
(प्रतिकिलो)
वाणाचे नाव      किमान दर     कमाल दर    सरासरी दर

जम्बो सीडलेस       ७०               ८५                ७५
नानासाहेब पर्पल    ७०               ८५                ७५
शरद सीडलेस        ५५               ६५                 ६०
सोनाका               ५०                ६०                ५५
आरके सीडलेस      ६०               ७५                 ६८
थॉमसन               ३५               ५०                 ४५

News Item ID: 
599-news_story-1578905489
Mobile Device Headline: 
द्राक्ष हंगामाची भिस्त फेब्रुवारीवरच
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Grapes season
Author Type: 
External Author
ज्ञानेश उगले
Search Functional Tags: 
द्राक्ष, भारत, हवामान, agitation, बांगलादेश, व्यापार, थंडी, नासा
Twitter Publish: 
Meta Description: 
Grapes season मागील वर्षी १० जानेवारीला ९८२.१४ टन माल युरोपात निर्यात झाला होता. त्या तुलनेत यंदा अजून बराचसा पल्ला गाठायचा आहे. तरीही वाढीचा वेग पाहता येत्या फेब्रुवारीमध्ये मागील वर्षीची गती साधली जाईल असे दिसते.
Send as Notification: 

0 comments:

Post a Comment