शास्त्रीय नावः ब्युटीया मोनोस्पर्मा
वनस्पतीचे वर्णन
- हा मध्यम उंच पर्णझडी वृक्ष विंध्य, सह्याद्री, हिमालयाच्या पायथ्याच्या जंगलात आढळतो.
- फुले लाल, केशरी रंगाची असून पाने गळून पडल्यानंतर येतात.
- या वृक्षापासून मिळणाऱ्या डिंकाचा व्यापार बेंगालकिनो या नावाने चालतो.
- पळसाचे झाड १० ते १५ मीटरपर्यंत उंच वाढते.
- हिवाळ्यात पानगळ होऊन वसंतात नवीन पाने येतात. पाने येण्यापूर्वीच फुले येतात.
- फुले लाल, केशरी रंगाची असून गुच्छाने येतात, त्यामुळे याला वणव्याचा वृक्ष असेही म्हणतात.
- शेंगा चपट्या फिकट हिरव्या असून वाळल्यावर तपकिरी, राखाडी रंगाच्या होतात. शेगेंच्या टोकाशी एकच बी येते.
उपयोगी भाग
पाने, फुले, बिया, मुळे आणि डिंक
औषधी उपयोग
- दम्यासाठी फुले रात्री पाण्यात भिजत ठेवून, सकाळी मीठ अथवा खडीसाखर मिसळून सेवन करतात.
- बियांपासून मिळणारे पिवळे तेल विविध औषधात वापरले जाते.
- फुले व डिंकाचा काढा करून दिल्यास मोडलेले हाड लवकर सांधले जाते.
- पळसाच्या बियांचे चूर्ण लिंबाच्या रसात मिसळून खरुज, गजकर्ण व त्वचारोगांवर लावतात.
- मुत्राशयाचे आणि किडनीच्या विकारांसाठी फुले गुणकारी आहेत.
जमीन व हवामान
- लागवड मुरमाड, हलकी ते मध्यम निचऱ्याच्या जमिनीत करावी.
- वृक्षाच्या वाढीसाठी उष्ण व समशितोष्ण हवामान पोषक आहे.
लागवड
- या बहुवार्षिक वृक्षवर्गीय वनस्पतीची लागवड वर्षभरात कधीही करता येते.
- लागवड ५ बाय ५ मीटर अंतरावर करावी. लागवडीपूर्वी बियाणे २ ते ३ तास कोमट पाण्यात ठेवून नंतर पेरणी करावी. बियाणे उगविण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागतो.
- खत, पाणी आणि तणाचे योग्य व्यवस्थापन केल्यास झाडांची वाढ चांगली होते.
इतर उपयोग
- पानाचा उपयोग द्रोण, पत्रावळी, बिडीनिर्मितीसाठी होतो.
- फुले रंग निर्मितीसाठी वापरली जातात.
संपर्कः डॉ. विक्रम जांभळे, (०२४२६) २४३२९२
औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प, (महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)
News Item ID:
820-news_story-1579346132
Mobile Device Headline:
जाणून घ्या बहुगुणी पळसाबद्दल..!
Mobile Body:

English Headline:
agriculture news in marathi cultivation of Sacred Tree
Twitter Publish:
0 comments:
Post a Comment